◾️ सरकारी जागेवर क्रिकेट सामने भरविण्यासाठी शिवसेनेच्या उपसरपंचाने दिले बेकायदेशीर परवानगीचे पत्र; बोईसर पोलिसांनी दिली बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर परवानगी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: अमली पदार्थ विक्रीचा आरोप असलेल्या एकाने चक्क शिवसेनेच्या बँनर खाली सुर्वे चषक सरावली येथील सरकारी जागेवर भरविले होते. विशेष म्हणजे या क्रिकेट सामन्यांची बोईसर पोलिसांन कडून परवानगी घेतना बनावट पत्राच्या आधारे पोलिसांनी परवानगी दिली असल्याचे उघड झाले आहे. सरावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत चक्क सरकारी जागेवर क्रिकेट सामने भरविण्यासाठी पोलिसांना पत्र दिल्याचे उघड झाले आहे. बोईसर पोलिसांनी देखील आपल्या कर्तव्यात कसुर करत बेकायदेशीर परवानगी दिल्याचे उघड झाले आहे
बोईसर शहरात तरूणाईला नशेच्या आहारी नेणाऱ्या ड्रग्स माफियांना बोईसर पोलिसांनी मोकळीक दिल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यातच आता बोईसर पोलिसांचा आणखी एक कारनामा समोर आला असून यावेळी तर चक्क बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रिकेट सामन्यांना बेकायदेशीर परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. अमली पदार्थ विक्रीचा आरोप असलेल्या निलेश सुर्वे यांने शिवसेनेच्या बँनर खाली सरावली ग्रामपंचायत हद्दीतील आनंदी नगर याठिकाणी फेब्रुवारी 2022 रोजी क्रिकेट सामने आयोजित केले होते. याठिकाणी विजेत्यांना बक्षीस व इतर लाखो रूपयाचा खर्च करण्यात आला होता. शिवसेना पदाधिकारी यांनी याठिकाणी सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. याठिकाणी सामन्यांना बोईसर पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी येथील सरावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक साळुंखे यांनी आपल्या सहीचे सामन्यांन साठी हरकत नसल्याचे बेकायदेशीर पत्र पोलिसांना दिले असल्याचे उघड झाले आहे. यामुळे बोईसर पोलिसांचा गैरमार्गाने राजकीय दबावाखाली बेकायदेशीर परवानगी देण्याचा प्रताप उघड झाला आहे.
क्रिकेट सामन्यांची परवानगी घेताना ज्याठिकाणी सामने भरवायचे असतात त्या जागेबाबत नाहरकत दाखला घेणे बंधनकारक असते. त्याच नाहरकत दाखल्यानुसार पोलिस देखील अटी शर्तीवर सामने खेळण्यासाठी परवानगी देतात. मात्र बोईसर पोलिसांनी बनवट पत्रावर सामन्यांची परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील आनंदी नगर भागात अवधनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या सरकारी जागेवर शिवसेने कडून निलेश सुर्वे यांच्या मार्फत सरकारी जागेवर भरवलेल्या सामन्यांची परवानगी मिळावी यासाठी सरावली ग्रामपंचायत उपसरपंच अशोक साळुंखे यांनी आपल्या सही शिक्याचा वापर करून सरकारी जागेवर सामने भरविण्यासाठी नाहरकत दाखल बोईसर पोलिसांना देण्यात आला होता. बोईसर पोलिसांनी देखील बनावट पत्राच्या आधारे नियमबाह्य परवानगी क्रिकेट सामन्यांना देण्यात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कायदेशीर कामे केली जातात असा मुखवटा दाखविणाऱ्या बोईसर पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी या बेकायदेशीर परवानगीला सहमती कशी दिली हा तपासाचा भाग आहे.
◾️सरावली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, क्रिकेट सामन्यान साठी कोणत्याही प्रकारची परवानगी ग्रामपंचायतीने दिलेली नाही. जागा महसूल विभागाची असल्याने याबाबत परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत सरावली तलाठी यांना विचारण्यात आले असता कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे बोईसर पोलिसांनी कसल्या आधारावर परवानगी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे.
◾️ सरावली ग्रामपंचायत उपसरपंच अशोक साळुंखे यांनी पोलिसांना दिलेले बेकायदेशीर बनावट पत्र याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, क्रिकेट सामन्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे पत्र दिलेले नाही. निलेश सुर्वे याच्या सोबत माझे कुठलेही संबंध नाही असे पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले आहे. मात्र बोईसर पोलिसांना याबाबत विचारणा केली असता उपसरपंच अशोक साळुंखे यांनी सही शिक्याचे पत्र दिले असल्याचे परवानगी विभागाचे कामकाज पाहणारे दादा शिंदे यांनी सांगितले.
◾️ सुर्वे चषक याठिकाणी शिवसेनेचे सर्व सरावली भागातील पदाधिकारी झाडून उपस्थित होते. यावेळी क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन शिवसेनेचे प्रभाकर राऊळ, अशोक साळुंखे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र सर्वे चषक साठी लाखो रूपये खर्च करणारे निलेश सुर्वे यांच्यावर नागरीकांनी अमली पदार्थ बाबत आरोप केल्याची बातमी समोर आल्यानंतर या सर्व नेत्यांनी याबाबत बोलताना सावध भुमिका घेत आमचा त्यांच्या सोबत काहीही संबंध नसुन आम्हाला न विचारता फोटो लावल्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.
◾️क्रिकेट सामने भरवताना आयोजक जी कागदपत्रे सादर करतात त्यानुसार परवानगी दिली जाते. सरावली येथील सुर्वे चषक बाबत कोणती कागदपत्रे सादर केली होती व जागे बाबत कोणत्या विभागाची परवानगी हवी होती याबाबत सविस्तर तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
— के. हेगाजे, उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर