◾️ गुन्हेगारी प्रवृत्तीच्याचे गुंडांना सोबत घेवून दमदाटी करणे पडले महागात; दोन गटात धक्काबुक्की व मारहाणीचे विडीओ आले समोर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेवून एका पोलिसांने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मारहाण व धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी खेळासाठी जमलेल्या मुलांनी दमदाटी करणाऱ्या एटीएसच्या पालघर पोलिसाला जाब विचारताना दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की व मारहाण देखील झाल्याचा विडीओ समोर आला असून यामध्ये पोलिसाला देखील धक्काबुक्की व मारहाण झाल्याचे दिसून आले आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील गंगोत्री हाँटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर गेल्या काही दिवसापासून क्रिकेट सामने सुरू होते. रविवारी सायंकाळी सामने संपल्यावर त्याठिकाणी बोईसर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला दिपक पाठक नामक इसम व त्यांच्या सोबत 4 ते 5 मुल उपस्थित होती. क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांन मधील एकासोबत याअगोदर झालेल्या वादाचा राग मनात ठेवून धक्काबुक्की करून मारहाण याठिकाणी सुरू झाली होती. याच वेळी दिपक पाठक या सराईत गुन्हेगारांने पालघर एटीएसचे पोलिस प्रशांत तुलकर यांना याठिकाणी बोलवुन घेतले होते. यावेळी प्रशांत तुलकर यांनी याठिकाणी येताच क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांना परवानगी आहे का, असे सांगत आरडाओरडा सुरू झाला होता. पोलिस आल्यानंतर दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांनी याठिकाणी मुलांना मारहाण देखील सुरू केली होती. पोलिसांन कडूनच दमदाटी होत असताना व त्यांच्या समोर मारहाण होत असताना काही लोकांनी याबाबत विडीओ चित्रिकरण सुरू केले होते. मारहाणीचा व दमदाटीचा विडीओ समोर आला असून गुन्हेगारी करण वाढत असलेल्या बोईसर मध्ये गावगुंडांना पोलीस देत असलेले पाठबळ या घटनेनंतर समोर आले आहे.
पालघर एटीएम मध्ये काम करत असलेले प्रशांत तुलकर हे बोईसर मध्ये गंगोत्री येथील मैदानावर जाताना एकटेच गेले होते. याबाबत त्यांनी आपल्या विभागाला किंवा बोईसर पोलिसांना देखील कळविले नव्हते. जर प्रशांत तुलकर यांच्या संपर्कात असलेल्या गुन्हेगारी मुलांनी त्यांना मारहाण झाल्याची खबर दिली असले तर याबाबत त्याचवेळी माहिती बोईसर पोलिसांना देणे अपेक्षित होते. मात्र आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना पाठबळ देण्यासाठी तुलकर हे पोलिस याठिकाणी गेले होते का असा सवाल उपस्थित राहत आहे. या घटनेनंतर पोलिसांचे गुन्हेगारी लोकांन सोबत असलेले संबंध समोर आले असून पोलिसांचे खबरीच आपल्या साहेबांच्या जोरावर दहशत माजवतात का असा प्रश्न निर्माण होत आहे. दोन्ही गटातील सुरू असलेल्या धक्काबुक्की व मारहाणीत प्रशांत तुलकर या पोलिसाला देखील धक्काबुक्की व मारहाण झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली असून विडीओ चित्रीकरणात देखील धक्काबुक्कीचा प्रकार दिसत आहे.
बोईसर भागात तरूणाई ही गुन्हेगारी कडे वाटचाल करत असुन याभागात अनेक मारहाणीच्या घटना रोजच होत असल्याचे दिसून येते. यातच आता गुन्हेगारी मुलांच्या सांगण्यावरून क्रिकेट मैदानात बोईसर पोलिसांना सुचित न करताच गेलेल्या प्रशात यांना देखील धक्काबुक्की व मारहाण झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार अंगलट आल्यानंतर प्रशांत तुलकर यांनी बोईसर पोलिसांना घटनास्थळी बोलवुन घेतले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली असून रविवारी रात्री पर्यंत प्रशांत तुलकर या पोलिसांने मारहाण झाल्या बाबत कोणत्याही प्रकारची तक्रार बोईसर पोलिस ठाण्यात दाखल केली नसल्याचे समोर आले आहे.