◾️तारापुर येथील न्युक्लियर फ्रेंड इंग्लिश मिडीयम स्कुल मधील धक्कादायक प्रकार; 10 वीत शिकत असलेल्या मुलीला परिक्षेला बसवावे यासाठी अपंग बापाची धडपड
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापुर अणुऊर्जा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्करपट्टी या गावातील प्रकल्पग्रस्त अपंग असलेल्या बापाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी धडपड करावी लागत आहे. रेल्वे अपघातात अपंग झालेल्या येथील एका प्रकल्पग्रस्तांची आर्थिक स्थिती दैनिय असल्याने तारापुर येथील शाळेत शिकत असलेल्या आपल्या मुलीची शाळेय शुल्क भरता आले नाही. यातच 10 वीची परिक्षा बुधवार पासुन परिक्षा सुरू होत असताना देखील शाळेने परिक्षा प्रवेश पत्र देण्यासाठी नकार दिला आहे. यामुळे मानसिक त्रासात मुली सह तिचे घरचे असुन यामुळे तिच्या शैक्षणिक अभ्यासात त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालघर तालुक्यातील अक्करपट्टी या प्रकल्पग्रस्त गावातील संजय काशिनाथ कोरे यांचा काही वर्षापूर्वी रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात त्यांना 81 टक्के अपंगत्व आले होते. यातच घरची आर्थिक परिस्थिती देखील बिकट असल्याने मुलीच्या शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवता आला नाही. त्यांची मुलगी पुर्णिता संजय कोरे ही 10 मध्ये असुन तारापुर येथील न्युक्लियर फ्रेंड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिक्षण घेत आहे. 10 वीची बोर्ड परिक्षा बुधवार 16 मार्च पासून सुरू होत आहे. मात्र शैक्षणिक शुल्क भरलेले नसल्याचे कारण पुढे करत शाळेय व्यवस्थापनाने परिक्षेचे प्रवेश पत्र नाकारले आहे. यामुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थीनीला परिक्षेच्या अभ्यासा बरोबर आपल्याला परिक्षेला बसुन दिले जाणार नाही या तणावाखाली ती आहे. शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एखाद्या अपंग बापाच्या मुलीला शिक्षणेचे बाजारीकरण केलेल्या संस्था अशा प्रकारे वेठीस धरत असल्याने याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शाळेय जिवनात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 10 वीच्या परिक्षेला आपल्या मुलीला बसता यावे साठी मुलीचे अपंग वडील संजय कोरे यांनी शाळेकडे अनेकदा विनवण्या केल्या आहेत. मात्र शाळेय व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुलीच्या पालका कडून केला जात आहे. विशेष म्हणजे पुर्णिता कोरे या विद्यार्थीनीला परिक्षेला बसुन द्यावे व त्यांना फ्री माफी द्यावी याबाबत पत्र तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सामाजिक बांधिलकी विभागाकडून देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत शाळेय व्यवस्थापनाने शुल्क भरल्या शिवाय परिक्षेचे प्रवेश पत्र देणार नसल्याची भुमिका घेतली असल्याचे संजय कोरे यांनी सांगितले आहे. संजय कोरे यांनी शाळेच्या मुजोर कारभारा विरोधात पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे तातडीने तक्रार दिली असुन मुलीला परिक्षा प्रवेश पत्र मिळावे याठिकाणी विनंती केली आहे. असे असले तरी उद्या पासून सुरू होणाऱ्या 10 वीच्या परिक्षेला प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
◾️न्युक्लियर फ्रेंड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या उभारणी साठी तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाकडून एक कोटी 50 लाखाचा फंड दिला होता. जेणेकरून प्रकल्पग्रस्त व आजूबाजूला असलेल्या गरिब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता येईल. मात्र अशा घटनेमुळे अणुऊर्जा प्रकल्पाचा उद्देश सफळ झाला नसल्याचे दिसून येत आहे.
◾️ शाळेतील शिक्षकांनी शाळेय शुल्क भरले नाही तर परिक्षेला बसु दिले जाणार नाही. असे माझ्या मुलीला देखील सतत सांगत त्रास दिला होता. यातच मला देखील शाळे कडून परिक्षा प्रवेश पत्र दिले जाणार नाही याबाबत सांगितले होते. शाळेय व्यवस्थापकांनी याबाबत योग्य निर्णय घेवून माझ्या मुलीच्या भवितव्याचा विचार करावा.
— संजय कोरे, पालक
◾️ शाळेय शुल्क भरले नसल्याने 10 वीच्या परिक्षेला पुर्णिता कोरे या विद्यार्थींनीला परिक्षा प्रवेश पत्र नाकारले असल्याने याबाबत नेमके कारण काय व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी न्युक्लियर फ्रेंड इंग्लिश मिडीयम स्कुलचे सचिव संज्योत राऊत यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत शाळेत विचारणा करून माहिती घेवुन सांगितले की, पुर्णिता कोरे या विद्यार्थीनीला परिक्षा प्रवेश पत्र दिले जाणार आहे. त्यांच्या पालकांनी शाळेत येवून ते घेवुन जावे शाळे कडून कधीही याबाबत नकार दिला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
◾️ शाळेचे सचिव संज्योत राऊत यांनी याबाबत विद्यार्थांच्या पालकांना व विद्यार्थीनीला शाळेत जावून परिक्षा प्रवेश पत्र घेवुन जाण्याबाबत माहिती दिल्यानंतर याबाबत पालघर दर्पण कडून पालकांना सांगण्यात आले होते. त्यानंतर संजय कोरे व त्यांची मुलगी मंगळवारी दुपारी 1:30 वाजता शाळेत गेले असता पुन्हा त्यांना तेथे उपस्थित असलेल्या शाळेच्या व्यवस्थापक समितीतील सावे नामक महिला पदाधिकारी यांनी शाळेचे शुल्क भरल्या शिवाय परिक्षा प्रवेश पत्र दिले जाणार नाही असे ठाम सांगितल्या नंतर अपंग असलेले संजय कोरे निराश होऊन माघारी परत आले. यामुळे शाळेच्या सचिवांनी परिक्षा प्रवेश पत्र बाबत केलेले विधान खोटे ठरले आहे.