◾️ शांतता कमिटीची बैठक पार पडल्यावर समाजकंटकांनी केला जमाव जमा
◾️ मदरशाच्या इसमाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: अनधिकृत उभारलेल्या एका मदरशाच्या इसमाला मारहाण केल्याची घटना घडली असुन यामुळे बोईसर मध्ये काही समाजकंटकांना वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मात शांतता निर्माण व्हावी यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक यांनी तातडीने बोईसर मध्ये येवून शांतता बैठक आयोजित केली होती. परंतु ही बैठक पार पडल्यानंतर बोईसर पोलिस ठाण्या बाहेर काही मुस्लिम समाजातील समाजकंटकांनी जमाव करून याठिकाणी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र बोईसर पोलिसांनी लागलीच गर्दी पळवून लावल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
बोईसर पोलिस ठाणे हद्दीतील धनानी नगर येथील अनधिकृत उभारलेल्या मदरशामध्ये 18 मार्च रोजी शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी वाद झाल्याबाबत तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात 19 मार्च रोजी दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आली आहे. यामध्ये अधिक माहिती अशी की, धनानी नगर येथे असलेल्या मदरशाच्या इसमाकडे डोक दुखतेय त्यासाठी दुवा करण्यासाठी एका युवका सोबत त्यांचे तिन मित्र गेले होते. याठिकाणी दुवा करून दुखणे बर केले जाते असा समज असुन याठिकाणी अनेक लोक कोणत्याही धर्माचे जात असुन महाराष्ट्र मध्ये जादुटोणा कायदा लागु असताना देखील असले प्रकार याठिकाणी घडत आहेत. मात्र 18 मार्च रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास डोक दुखते यासाठी दुवा करण्यासाठी गेलेल्या एका युवकांच्या डोक्यावर फुक मारताना मदशामध्ये असलेल्या कुरेशी यांची थुंकी उडल्याचे समजतात याठिकाणी असलेल्या युवकांने त्या इसमाच्या कानशिलात लगावली व त्याठिकाणाहुन निघून गेले होते. याबाबत काही लोकांनी धर्माचा रंग लावुन हे प्रकरण दुसऱ्या दिवशी तापविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
धनानी नगर येथील मदरशामध्ये झालेल्या प्रकाराबाबत मुस्लिम धर्मातील काही लोकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत बोईसर पोलिस ठाण्याबाहेर सुमारे 150 ते 200 लोकांचा जमाव 19 मार्च रोजी शनिवारी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत ताकद दाखविण्याचा प्रकार याठिकाणी घडला होता. पोलिसांनी देखील याबाबत गुन्हा रजिस्टर क्र. 120/2022 प्रमाणे भा.द.स.ही 452, 323, 503, 34 प्रमाणे मोईन्नीदीन अब्दुल कुरेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिषेक उर्फ नंदन सिंग, प्रिंन्स, राजन, संतोष उर्फ बटटू यांच्या सह इतरांवर गुन्हा 19 मार्च रोजी दुपारी 2 वाजुन 56 मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत मदरशामध्ये जाऊन मारहाण केल्याचा दावा करण्यात आला असुन यामध्ये समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या विडीओ चित्रात दुवा करण्यासाठी गेलेला एकानेच मदरशाच्या दरवाजा बाहेर कानशिलात लगावल्याचे दिसून येत आहे.
बोईसर पोलिसांवर दबाव टाकून मोठा जमाव करून मुस्लिम नेत्यांनी राजकीय दबाव याठिकाणी आणुन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे. यातच पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत घटना मदरशामध्ये घडली असल्याचे म्हटले आहे. यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहत असुन पोलिसांनी दाखल केलेला कलम 452 हा घरामध्ये शिरकाव करून मारहाण करण्याबाबत असुन हा कलम दाखल केल्याने याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. मुळात मदरसा ही वैयक्तिक खाजगी जागा नसल्याने किंवा हे मोईन्नीदीन अब्दुल कुरेशी यांचे मालकी घर आहे किंवा फक्त राजकीय रंग देण्यासाठी याला मदरशाचा उल्लेख केला गेला आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. मुळात बोईसर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या इसमावर कडक कारवाई कायदेशीर पणे करणे गरजेचे असून एखाद्या धर्माच्या दबावाखाली चौकशी न करताच दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आक्षेप घेतला जात आहे.
बोईसर पोलिसांनी दोन्ही धर्मात शांतता राहावी यासाठी पुढाकार घेवून शांतता बैठक बोईसर पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी पार पडली. अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी के. हेगाजे, पोलिस निरीक्षक सुरेश कदम व इतर पोलीस अधिकारी व राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. बैठकीत दोन्ही बाजुने शांतता राखण्याबाबत एकमत झाले. बैठक संपल्यावर रात्री आठ वाजताच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम युवकांनी व नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत पोलिसांनी लागलीच याठिकाणी जावून परिस्थिती वर नियंत्रण ठेवले होते. याच दरम्यान रात्री 8 वाजुन 30 मिनिटांनी शांतता बैठकीसाठी आलेले बजरंग दलाचे चंदन सिंग आपल्या घरी जाण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यावर याठिकाणी जावेद लखानी व त्यांच्या सोबत असलेल्या एका इसमाने चंदन सिंग यांच्या सोबत वाद घालण्याचा प्रयत्न करून मोठ्या आवाजाने गोंधळ घालून जमाव भडकविण्याचा प्रयत्न केला होता. याच वेळी त्याच्या सोबत असलेले जमावाने देखील याठिकाणी गोंधळ घालत आरडाओरडा सुरू केला. याबाबत बोईसर पोलिसांनी दंगलग्रस्त पथक तैनात करून लागलीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
◾️बोईसर मध्ये एका ठिकाणी शांतता राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना दुसरीकडे तारापुर, चिंचणी, अवधनगर, मजीद गल्ली बोईसर याभागातील मुस्लिम लोक बोईसर भागात जमा झाली होती. हा जमाव जाणीवपूर्वक बोईसर पोलिस ठाण्यात आणला असल्याचे घडलेल्या प्रकारानंतर दिसून आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शांतता बैठक घेताना केलेल्या आवाहना नुसार हिंदू धर्माचे राजकीय पुढारी सोडले तर एकही इसम पोलिसांनी केलेल्या शांततेच्या आवाहना नंतर पोलीस ठाण्यात उपस्थित राहिला नाही. परंतु जाणीवपूर्वक जातीय तेड निर्माण करण्यासाठी उपस्थित राहिलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.