◾️बोईसर मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांचा सट्टेबाजी करणारा ताब्यात; सट्टेबाजी साठी पैसे लावणारे इतर 26 मात्र मोकाट?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या माहिती नंतर बोईसर येथे गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. बोईसर दलाल टाँवर येथील खोलीत हा सर्व प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे काही तासात गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या बोईसर युनिटच्या अधिकाऱ्यांना सट्टेबाजी प्रकरणात असलेल्या इतरांचा शोध दोन दिवस उलटून देखील लावता आला नाही. यातच या प्रकरणात बोईसर येथील एक बँनर दुकान चालवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
बोईसर स्थानिक गुन्हे शाखेचे युनिट गेल्या अनेक महिन्यांन पासून चर्चेत आले असुन तडजोडीत अग्रेसर असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. यातच महाविकास आघाडीचे वसुलीचा आरोप असले माजी गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी पाठवलेल्या पालघरच्या पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांचे विश्वासू असलेले वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील गुटखा प्रकरणा नंतर आता सट्टेबाजी प्रकरणात अधिकच चर्चेत आले आहेत. 31 मार्च रोजी पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्या कडून मिळालेल्या माहितीनुसार बोईसर युनिटने बोईसर दलाल टाँवर येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजी करत असलेल्या बोईसर येथील मुख्य सुत्रधार फिरोज खान याला सायंकाळी साधारण 6 वाजता ताब्यात घेतले होते. खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिरोज खान हा गेल्या काही वर्षापासून सट्टेबाजी करत असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने केलेल्या कारवाई नंतर याच सट्टेबाजी करणाऱ्या फिरोज ला सोडविण्यासाठी बोईसर येथील बँरन दुकान चालवणारा जुमानी नामक एक इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या बाहेर व अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे. यातच ताब्यात घेतलेल्या रात्री फिरोज याचा मोबाईल ताब्यात घेवुन त्याला रात्री सोडण्यात आले होते. यातच दुसऱ्या दिवशी 1 तारखेला आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई स्वागतार्ह असुन अशा सट्टेबाजी करणाऱ्यांना लगाम लावणेगरजेचे आहे. ज्याप्रमाणे इतर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे दाखल काही तासात आरोपींना अटक केली अशा प्रकारच्या बातम्यांचे प्रसिद्ध पत्रक काढते त्याप्रमाणे सट्टेबाजी मध्ये ताब्यात घेतलेल्या फिरोज खानच्या संपर्कात असलेले व लाखोचा सट्टा लावणाऱ्या इतरांना अद्यापही ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही. यामुळे सट्टेबाजी कारवाईत कोणाला सट्टा लागतो याबाबत अनेक उलट सुलट चर्चा बोईसर भागात सुरू आहेत. विशेष म्हणजे या फिरोजच्या संपर्कात बोईसर व परिसरातील नामांकित 26 लोक असल्याची चर्चा सध्या बोईसर मध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सट्टेबाजी बाबत गुन्हा दाखल असुन पुढील तपास सुरू आहे. इतर 26 लोक कोण याबाबत आपल्यांना माहिती असेल तर सांगावे असे बेताल व्यक्तव्य करत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले आहे. या प्रकरणात अधिकच तपास होणे गरजेचे असले तरी दत्तात्रेय शिंदे यांची फौज नेमकी काय कारवाई करते व कोणाला बाजूला ठेवते हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.