◾️ अपली पदार्थ विकणाऱ्या माफियाच्या घरी टाकलेली बनावट धाड उघड; पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर केला बनावट पंचनामा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: बनावट काम करण्यासाठी आणि खोटे पंचनामे बनविण्यासाठी तरबेज असलेल्या बोईसर पोलिसांचा पुराव्यानिशी कारनामा उघड झाला आहे. येथील एका अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाला वाचवण्यासाठी खुद्द बोईसर पोलिसांनी बनावट पंचनामा केल्याचे उघड झाले आहे. यामुळे आता अमली पदार्थ माफियांना पोलिसांचे असलेले पाठबळ यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बोईसर पोलिस ठाणे हद्दीतील भंडारवाडा भागातील नागरिकांनी आपल्या भागात निलेश सुर्वे विकत असलेल्या अमली पदार्थ बाबत तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर यांच्या कडे 13 जुलै 2021 रोजी केली होती. यानुसार पुढील चौकशी साठी नागरीकांचा तक्रारी अर्ज बोईसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. अर्जाची चौकशी करताना 19 जुलै 2021 रोजी बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांनी एक बनावट तपासणी पंचनामा केल्याचे उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरळकर यांनी 19 जुलै 2021 रोजी अमली पदार्थ विक्री चा आरोप असलेल्या निलेश सुर्वे यांच्या भंडारवाडा येथील घरात धाड टाकल्याची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. यानुसार निलेश सुर्वे यांच्या घरी झाडाझडती घेतली त्यावेळी कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ ब्राऊन शुगर सापले नसल्याचा उल्लेख घरझाडती पंचनामा मध्ये उल्लेख आहे.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पालघर दर्पण व पत्रकार टिमने याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक सत्य समोर आले आहे. बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांनी केलेला तपास हा संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे. 19 जुलै 2021 रोजी भंडारवाडा येथे केलेल्या पंचनामा मध्ये पंच असलेले पंच क्रमांक 2 यांनी याबाबत लेखी देत सांगितले की, बोईसर पोलिस ठाण्यात गेलो असता त्यावेळी पोलिसांनी माझी पंचनामा असलेल्या कागदावर सही घेतली असल्याचे सांगितले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणा बाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचा धक्कादायक खुलासा पंच क्रमांक 2 ने केला आहे. यामुळे बोईसर पोलिसांनी बनावट केलेला पंचनामा उघड झाला असुन बोईसर पोलिस हे पोलिस ठाण्यात बसुन पंचनामा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पंचाने आपला खुलासा कँमेरा समोर सांगितला असल्याने बनावट पंचनामा प्रकरणाचे गुड अधिकच वाढत चालले आहे.
पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांनी बनवलेल्या पंचनामा मध्ये घराची झाडाझडती घेतली यावेळी कोणत्याही प्रकारचे ब्राऊन शुगर किंवा कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आली नसल्याचा उल्लेख आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पंच क्रमांक 1 यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत धक्कादायक खुलासा करत सांगितले की, पोलिसांनी टाकलेल्या धाडीच्या वेळी निलेश सुर्वे यांच्या घरी अमली पदार्थ सापडले असल्याचा धक्कादायक खुलासा केल्याचे सांगत या प्रकरणाला वेगळेच वळण लावले आहे. बोईसर पोलिसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या निलेश सुर्वे यांच्या घरी धाड टाकली तेव्हा अमली पदार्थ मिळाले होते. तसेच हा ड्रग्स विक्री करतो हे सर्वांना माहीत असल्याचा धक्कादायक खुलासा यांनी दुरध्वनी वर संपर्क साधला असताना पंच क्रमांक 1 ने केला आहे. खुद्द पंचाने केलेल्या खुलाशा मुळे बोईसर पोलिस अधिकच अडचणीत आले असुन पोलिसांचा बनावट कारनामा उघड झाला आहे.
◾️निलेश सुर्वे यांच्या घरी टाकलेली धाड बाबत पंचनामा हा 19 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5: 30 वाजता सुरू करून सायंकाळी 6 वाजता पुर्ण केल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे याच दिवशी निलेश सुर्वे यांच्या जवळच्या दोन इसमांचा जबाब पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांनी घेऊन कागदोपत्री निलेश सुर्वे हा निर्दोष असल्याचा बनाव रचला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
◾️ बोईसर भंडार वाडा येथील रहिवासी यांनी ड्रग्स विक्री बाबत तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे केली होती. याबाबत तपासणी अहवाल मध्ये खोटी माहिती सादर करून हा अर्ज निकाली काढला होता. याबाबत पोलिस अधीक्षक पालघर यांच्या कडे सादर केलेल्या अहवालात पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी नागरिकांनी केला तक्रारी अर्ज हा अंतर्गत वैमनस्यातुन केलाचा धक्कादायक उल्लेख केला असल्याने उघड झाले आहे.
◾️ भंडारवाडा येथील निलेश सुर्वे यांच्या घरी धाड टाकली होती. याबाबत पंचनामा केला असुन कुठलाही बनावट पंचनामा केलेला नाही.
— शरद सुरळकर, पोलिस उपनिरीक्षक बोईसर