◾️ राजकीय वरदहस्त असलेल्या सुर्वेच्या तोडून निघणार कोणाची नावे; बोईसर पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरातील ड्रग्स माफियाला पोलिसांनी एका गांजा प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट असलेला ड्रग्स माफिया पत्रकारांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागला आहे. यातच बोईसर पोलिसांना देखील या माफियांच्या संपर्कात असलेल्या बड्या माशांचा शोध घेण्याचे आवाहन आहे. यातच पकडण्यात आलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला याचा शोध घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
औद्योगिक नगरीचे शहर असलेल्या बोईसर सध्या अमली पदार्थाच्या गोरखधंद्या साठी चर्चेत आले आहे. येथील राजकीय पाठबळ व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ड्रग्स माफिया गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट होता. मात्र काही दिवसांपूर्वी पत्रकारांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा गांजाचा साठा पकडण्यात आला होता. याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात बोईसर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये मुख्य सुत्रधार असलेला निलेश सुर्वे याला बोईसर पोलिसांनी गुरूवारी दुपारी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी 15 एफ्रिल रोजी त्याला पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासाकडे नागरिक आशेने पाहत असुन चार दिवसाच्या पोलिस कोठडी निलेश सुर्वे कडून कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच बोईसर मधील मोठे रँकेट उघड होण्याची शक्यता असल्याने निलेश सुर्वे याला राजकीय पाठबळ दिलेल्या नेत्यांना सुर्वे याच्या अटकेने घाम नक्कीच फुटला असेल.
बोईसर पोलिसांना अमली पदार्थ विक्री करणाऱ्या निलेश सुर्वे बाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र राजकीय दबावामुळे किंवा आणखी कोणत्या आर्थिक गणितामुळे या माफिया कडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात होता. अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांची लक्तरे काढणाऱ्या अनेक पुराव्यानिशी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर बोईसर पोलिसांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र योग्य वेळीच बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम व तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांनी अमली पदार्थ माफिया सुर्वेला सर्व पुराव्यानिशी ताब्यात घेतले आहे. बोईसर व परिसरातील काही राजकीय मंडळी या माफियाला आजवर पाठबळ देत आले आहेत. यातच काही पोलिस देखील या माफियाच्या सतत संपर्कात असल्याने या निलेश सुर्वे यांचे साधारण 6 मोबाईल क्रमांक तपासणी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे बोईसर पोलिसाच्या चौकशीत सुर्वेच्या तोडून आता कोणाची नावे येतात हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.
◾️ बोईसर भंडारवाडा परिसरातील नागरिकांनी ड्रग्स माफिया निलेश सुर्वेच्या विरोधात लेखी तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर याच्या कडे केली होती. मात्र सुर्वे हा अमली पदार्थ विक्री करत नसल्याचा धक्कादायक उल्लेख बनावट पंचनामा करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांनी केला होता. याबाबत खुद्द पंचानेच खुलासा करत पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून सही केलाचा लेखी खुलासा केला आहे.
◾️बोईसर पोलिस ठाण्याचा गुन्हे प्रगटीकरण विभाग व त्यांचे प्रमुख असलेले पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी या अधिकाऱ्यांची साधी चौकशी देखील करण्यात आली नव्हती. यातच याच सुरळकर यांच्या टिम मध्ये असलेले दोन पोलिस कर्मचारी हे ड्रग्स माफिया निलेश सुर्वे यांच्या वारंवार संपर्कात असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर आली होती. पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी साधारण चार दिवसापूर्वी याच विभागात असलेल्या एका पोलिस कर्मचारी देवा पाटील यांचे कामाचे ठिकाण बदलून त्याला आरोपी ठेवत असलेल्या लाँकप जवळ तैनात करण्यात आले असल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे.
◾️ड्रग्स माफिया निलेश सुर्वे यांने शिवसेना सरावली विभागात एक लाख रूपये खर्च करून क्रिकेट सामने भरवले होते. या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे फोटो होते. यातत या सामन्यांची बेकायदेशीर परवानगी बोईसर पोलिसांनी दिली होती. यातच येथील शिवसेनेचे उपसरपंच अशोक साळुंखे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी जागेवर सामने खेळण्यासाठी बनावट पत्र दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले होते. याबाबत तक्रार दाखल असुन महिना उलटत आला तरी बोईसर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
◾️ निलेश सुर्वेचा साथीदार माया व अन्या हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आजुनही मोकाट आहेत. दोन दिवसापूर्वी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पत्रकारांच्या मदतीने पोलिसांनी धाड टाकली यावेळी सर्व पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र त्याठिकाणी माया नावाच्या इसमाची दुचाकी उभी होती. ही दुचाकी मायाच्या भावाची असुन याचे कागदपत्रे भलत्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेवून दोन दिवस उलटून गेले असले तरी याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा चौकशी झालेली नाही.