पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: तालुक्यातील मौजे खुपरी येथील क्लार्क रबर प्रा. लि. या कंपनीला रविवारी पहाटे शाॅट सर्कीट ने भिषण आग लागली. या आगीत लाखोचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कंपनी बंद असल्याने जिवित हाणी झाली नाही.
करोनाच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदी सुरू असुन तालुक्यातील सर्वच कंपन्या बंद आहेत. खुपरी येथील क्लार्क रबर कंपनीही बंद आहे. मात्र आज अचानक पहाटे या कंपनीला भिषण आग लागली. भिवंडी, वसई व बोईसर येथून आलेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी दुपारपर्यंत ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीत कच्चा व पक्का माल तसेच यंत्र सामुग्री जळुन खाक झाली होती. ही आग शाॅट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत चाळीस लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या कंपनीचे मालक पंकज गटानी यांनी सांगितले. आगीची चौकशी स्थानिक पोलीस करीत आहेत.