◾️ शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजाराची लाच स्विकारताना अटक
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त ठरलेल्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना एका शिक्षिके कडून आपल्या घरात 25 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
शजिल्हा निर्मिती पासून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग लाचखोरीसाठी नावलौकिक झाला होता. यातच सलग दोन वेळा या विभागात लाचखोर अधिकाऱ्यांन वर कारवाई झाली असल्याने शिक्षण विभागाचा लाचखोर चेहरा समोर आला आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याला तीन वर्षांपूर्वी कार्यालयाच्या बाहेर लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. त्यानंतरही या विभागातील कामकाजात कुठलाही सकारात्मक बदल झालेला नव्हता. जिल्ह्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी सोमवारी 25 एफ्रिल रोजी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी शिक्षिकेकडे 25 हजाराची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लता सानप यांच्या घरात 25 हजाराची लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले असुन याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.
पालघर मध्ये शिक्षणाधिकारी पदाचा कारभार हाती घेतल्या नंतर लता सानप यांच्या उर्मट वागण्याचा अनुभव अनेकांना आला होता. जिल्हा परिषद पदाधिकारी,सदस्य यांचा मानसन्मान त्या ठेवत नसल्याचे आणि उद्धट वागत असल्याच्या तक्रारी करून त्याची बदली करावी असा ठराव जिल्हापरिषदेच्या सभेत घेण्यात आला होता. नुकत्याच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत समितीने त्याच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत कडक ताशेरे ओढले होते. तरीही त्यांच्या वागण्यात कुठलाही बदल झालेला नव्हता.