◾️गेल्या 5 वर्षात इफ्तार पार्ट्या देवुन कोणत्या ठिकाणी राहिली शांतता; तारापूर मध्ये गाईची कत्तल सुरूच
◾️मुस्लिम धर्मातील नेत्यांनसाठी पोलिसांन कडून समझोता पार्टी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: दोन धर्मात शांतता आणि एकोपा वाढावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस सर्वत्र आपापल्या भागात इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. मुस्लिम समाजातील लोकांना इफ्तार पार्टी देवुन दोन्ही धर्मात एकोपा राहावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात असले तरी या इफ्तार पार्टीतुन मुस्लिम समाजातील नेत्यांनी कोणता धडा घेतला हे आजवर समजु शकलेले नाही. यातच अशा अनेक इफ्तार पार्ट्यातुन समाजातील सामजस्व टिकवून ठेवण्याचा संदेश देताना पोलीस हा इफ्तार पार्टीचा खर्च स्वतःच्या पगारातून भागवत असतील यावर सर्वसामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे.
पालघर जिल्ह्यात हिंदू -मुस्लिम या दोन्ही धर्मात शांतता राहावी यासाठी अनेक प्रकरणात हिंदू धर्मातील लोकांनी सामाजिक स्वास्थ्य टिकून राहावे यासाठी एक पाऊल मागे घेतली आहे. मग गोहत्या बाबत विषय असो किंवा जातीय वाद यामध्ये सलोखा राखण्याचे काम नेहमी येथील हिंदू करत आला आहे. शिरगाव येथील कमलिशाह बाबांच्या दर्ग्यात मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मीय मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असल्याचे दिसून येते. असे असताना अनेक वर्षांपासून शेकडो इफ्तार पार्ट्या झाल्या तरी देखील मुस्लिम धर्मातील नेत्यांनी शांतता राखण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊन असे कोणते प्रयत्न आजपर्यंत केले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बोईसर तारापूर भागात नेहमीच गोहत्या करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. किनारपट्टीवरील गावातील मुस्लिम समाजाकडून मात्र अश्या कृत्या बाबत संयमाची भूमिका असल्याचे दिसून येते. इफ्तार पार्ट्या करून त्यानंतर देखील गाईंची कत्तल हिंदू धर्मियांची वस्ती असलेल्या भागात करून हिंदूंच्या भावना पायदळी तुडविल्या जातात. स्थानिक पोलिस ही चिरीमिरी च्या नावाखाली अशा घटनाकडे अनेक वेळा कानाडोळा करतात. ज्यावेळी हिंदूवादी संघटना याबाबत आवाज उचलते त्यानंतर गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई केली जाते हे सत्य आहे.
बोईसर पोलिस ठाण्यात देखील शनिवारी 23 एफ्रिल 2022 रोजी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक पक्षातील राजकीय नेत्यांना याठिकाणी बोलविण्यात आले होते. मुस्लिम समाजातील नेते देखील याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातच पालघर पोलिस दलाकडून देखील रविवारी 24 एफ्रिल रोजी पालघर मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी जमवाजमव करून या पार्टीचे आयोजन केले होते. जातीय सलोखा बरोबर वरिष्ठ अधिकारी यांना आपण काही तरी करतो दोन धर्मात शांतता राहावी यासाठी केलेला हा प्रयत्न समजावा. परंतु असल्या इफ्तार पार्टीतून खरोखरच दोन धर्मात सलोखा राहतोय का असा सवाल उपस्थित राहत आहे. एकिकडे हिंदू धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातील अशी कृत्ये वारंवार होत असताना या कडे मुस्लिम धर्मातील नेते व जाणकार मंडळींनी आजवर पुढाकार का घेतला नाही हा सवाल देखील उपस्थित राहत आहे. पोलिसांन कडून इफ्तार पार्टी देवुन एकदिवसीय दोन्ही धर्मातील शांततेचे वातावरण असल्याचे दाखवून देत असले तरी परिस्थिती ही वेगळीच असल्याचे अनेक घटनांन मधून दिसून येते.
तारापूर मध्ये काही महिन्यांन पुर्वी गोहत्या बाबत गंभीर घटना समोर आली होती. याबाबत तारापूर पोलिसांना हिंदुत्ववादी संघटने कडून माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींचा पाठलाग करताना मुस्लिम मोहल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना काही मुस्लिम लोकांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी पोलिस देखील निमुटपणे मारखाऊन माघारी आले होते. मात्र अशी गंभीर घटना घडली असताना देखील पालघर पोलिस अधीक्षक यांनी काय ठोस कारवाई केली हा मोठा प्रश्न आहे. पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करून देखील याठिकाणी पोलिस अधीक्षक फिरकले सुध्दा नसल्याने या घटनेतून पोलिसांचे मनोबल नक्कीच खच्चीकरण झाले असणार. जातीय राजकारण व विशिष्ट धर्माला सत्ताधारी पक्ष झुकते माप देत असल्यानेच पोलिस देखील मारखाऊन निमुटपणे गप्प राहिली का हा सवाल उपस्थित राहत असला तरी याकडे कोणीही गांर्भीयांने पाहताना दिसून येत नाही.
◾️पालघर जिल्ह्यात अनेक पोलिस ठाण्यात इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. याठिकाणी फळे व जेवणाची मेजवानी असते याठिकाणी हजारो रूपये खर्च पोलिस करत असतात. मुस्लिम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात पोलिस विभाग इफ्तार पार्टी आयोजन करताना करत असलेला खर्च कोणत्या मार्गाने आलेला आहे ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र हा खर्च करण्यासाठी पोलिस कुठल्या निधीतून खर्च करतात तसेच याबाबत कायद्यात तशी तरतूद आहे का हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा खर्च करण्यासाठी देणगी घेतली जाते का किंवा संबंध पोलिस निरीक्षक हा स्वतः आपल्या खिशातून खर्च करतो का? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
◾️ हिंदू धर्मातील अनेक वेगवेगळ्या महिन्यात उपवास असतात मग त्यात महत्त्वाचा श्रावण महिना असो किंवा नवरात्री असे अनेक महत्त्वाचे सणवार असले तरी आजवर कधीही पोलिसांनी याकडे लक्ष दिलेले नाही. बेंजो बंद, डीजे बंद, स्पीकर आवाज कमी करा असा सज्जड दम हिंदूंच्या सणातच दिला जात असल्याने पोलीस विरोधात नाराजी आहे. यातच बौद्ध धर्माच्या बाबतीत देखील कधी जातीय सलोखा राहावा यासाठी सर्व धर्म समभाव म्हणून एकत्रित येण्यासाठी स्नेह भोजन कार्यक्रम केलेला दिसून येत नाही. मुळात या धर्मातील लोकांन कडून अशी कोणतीही अपेक्षा पोलिस खात्याकडे नाही.