◾️ विराज प्रोफाइल कारखान्यात तुफान हाणामारी; 27 कामगार पोलिसांच्या ताब्यात
◾️दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्यासाठी कारखानदारांच्या गावगुंडांचा हात?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: कामगारांना वेठीस धरणाऱ्या विराज प्रोफाइल कारखान्यात व्यवस्थापन व कामगारांचा वाद शिगेला पोचला आहे. येथील कारखाना व्यवस्थापकांने राजकीय खेळी करून अतिरिक्त कामगार संघटना स्थापन केल्याने झालेल्या वादाने शनिवारी कारखान्यात कामगार आक्रमक होऊन दगडफेक केली. या गंभीर घटनेत कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना देखील मारहाण करण्यात आली असुन दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्यासाठी नेमका हात हा कोणाचा याचा शोध घेणे गरजेचे आहे.
विराज प्रोफाइल कारखान्यात युनियनच्या झालेल्या वादावरून शनिवारी 7 मे रोजी दुपारच्या वेळी गदारोळ झाला. यावेळी आक्रमक झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी बोईसर पोलीस मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांवर देखील हल्ला करत दगडफेक केल्याचे चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रकरण अधिकच चिघळल्या नंतर मोठा पोलिसांचा फौजफाटा विराज प्रोफाइल कारखान्यात दाखल झाला होता. या तुफान हाणामारीत 80 कामगारांसह 16 पोलीस जखमी झाले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोईसर पोलिसांनी 27 कामगारांना ताब्यात घेतले असले तरी हा वाद कोणामुळे झाला याचा शोध आजुन कागदावर आलेला नाही.
विराज प्रोफाइल हा उद्योजक आपल्या कामगारांचे शोषण करत असल्याचा आरोप कामगार संघटना कडून केला जात असुन याठिकाणी कामगारांनी आवाज उचलल्यानंतर उद्योजक हा बोईसर पोलिस अधिकारी यांना याठिकाणी बोलावुन घेत असल्याचे दिसून आले आहे. आजवर बोईसर पोलिसांना पुढे करून कामगारांवर दबाव आणला गेला होता. शनिवारी झालेल्या तुफान हाणामारीचा प्रकार विराज उद्योजकाकडून आणण्यात आलेल्या 150 पेक्षा अधिक गावगुंडा कडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली आहे. मुंबई लेबर युनियनच्या सदस्यांना युनियन पासून तोडण्यासाठी उद्योजकाकडून याठिकाणी एक कामगार संघटना येथील काही स्थानिकांना पुढे करून स्थापन करण्यात आली. उद्योजकांने घाणेरडे राजकारण करून कामगारांना चिथावण्याचा प्रयत्न केला होता. याचाच परिणाम शनिवारी झालेल्या हाणामारीत व दंगल सदृश्य झालेल्या स्थितीत दिसून आला.
◾️विराज ग्रुप मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दोन युनियन स्थापने वरून वाद सुरू होता. यामध्ये मुंबई लेबर युनियन च्या बाजूने 60 टक्क्याहून अधिक कामगार उभे राहिले व त्यांनी लेबर युनियन च्या नावाखाली नोंदणीही केलेली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन लेबर युनियनला थारा देत नसून इतर युनियनला सहकार्य करून मुंबई लेबर युनियनला कंपनीमध्ये शिरू देत नाही असा आरोप केला जात होता. यावरूनच गेल्या दोन चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती व आता ही नाराजी दगडफेक व मारहाणीत रूपांतर झाले. घटनास्थळी कारखान्यात एक हजार पेक्षा अधिक कामगार आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले होते.
◾️विराज प्रोफाइल कारखान्यात शनिवारी झालेली तुफान हाणामारी व दगड फेक ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विडीओ चित्रीकरणात दिसून आलेली आहे. या मारहाणीत जखमी झालेले कामगार नेमक्या कोणत्या संघटनेचे हे अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांच्या पाठबळामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची चर्चा सद्या बोईसर मध्ये सुरू आहे. यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण करण्यासाठी कोणाचा हातभार होता याचा शोध बोईसर पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.
◾️विराज प्रोफाइल कारखान्यात अनेक वेळा वाद होऊन देखील याठिकाणी फक्त आपला फौजफाटा बोईसर पोलिस नेहमीच नेवुन उभा करतात. मात्र आजवर या प्रकाराबाबत कोणतीही खबरदारी पोलिसांनी घेतली नाही. कामगारांन मध्ये पसरलेली अशांतता व गावगुंडांना पुढे करून विराज प्रोफाइल उद्योजक कामगारांना चिथावण्याचा प्रयत्न करत असल्याची खुलेआम असलेली माहिती बोईसर पोलिस ठाण्याच्या गोपनीय विभागाला लागली नाही हे विशेष आहे.