◾️ फेसबुक वर तलवार दाखवुन दहशत निर्माण करणारा उपसरपंच संदिप घरत बोईसर पोलिस कारवाई करणार का
◾️विराज प्रकरणात देखील याच उपसरपंचाने कारखानदारला कुमक पुरवल्याचा होतो आरोप
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: समाजमाध्यमावर तलवारीचे फोटो टाकुन दहशत निर्माण करणाऱ्याची क्रेझ गेल्या काही काळापासून दिसून येत आहे. असाच प्रकार बोईसर मध्ये दिसून आला असुन येथील एका उपसरपंचाने तलवार उगारून दाखवलेला फोटो आपल्या प्रोफाइल वर ठेवल्याचे दिसून आले आहे. यामुळे अशा दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पालघर तालुक्यातील बेटेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदिप घरत यांने आपल्या समाजमाध्यमावर तलवार उगारून दहशत निर्माण करणारा फोटो प्रसिद्ध केल्याचे दिसून आले आहे. फेसबुकवर हा फोटो डिपी साठी ठेवण्यात आला असुन अशा लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे हाच संदिप घरत नामक व्यक्ती उपसरपंच पदावर कार्यरत असला तरी आपल्या भागात सरकार नावाने ग्रुप बनवुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. जाहीर सभेत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जर तलवार उगारून दाखवली तर तातडीने गुन्हा दाखल केला जातो. मात्र पालघर जिल्ह्यात तलवारी उगारून फोटो काढून ते प्रसारित करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने यावर ठोस कारवाई होत नसल्याने तलवार दाखवून दहशत माजविणारे सध्या तरी मोकाटच आहेत.
◾️बोईसर भागात गेल्या काही दिवसापासून विराज प्रोफाइल कारखान्यात झालेला रक्तरंजित हाणामारी हा विषय चर्चेचा विषय आहे. याच प्रकरणात गावगुंडांची फौज उद्योजकाला काही स्थानिक नेत्यांनी पुरवली असल्याचा आरोप केला जात आहे. यातच बेटेगाव येथील उपसरपंच संदिप घरत या इसमाचे नाव आघाडीवर असुन हा शिवसेनेचे मुकेश पाटील यांचा सहकारी असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे.
◾️विराज प्रोफाईलचे मालक निरज कोच्चर हे बोईसर येथील शिवसेनेचे मुकेश पाटील यांच्या जवळचे आहेत. विराज प्रोफाइल कारखान्यात विविध प्रकारची कामे मुकेश यांच्या सहकार्यांच्या नावाने असलेल्या कंपन्यांना मिळतात. तसेच मुकेश पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून राजकीय समिकरणे जमविण्यासाठी संदीप घरत यांना विराज मधील ठेके मिळवून दिले असल्याचे देखील बोलले जाते. ज्याठिकाणी स्थानिक न्याय हक्कासाठी आवाज उचलतात त्याठिकाणी याच टिमला विराजचा मालक पुढे करतो.
◾️यासंपुर्ण प्रकरणाबाबत संदिप घरत यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी व त्यांची बाजु ऐकून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी वारंवार मी भेटतो बोलतो असे सांगत कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.