◾️ बोईसर खोदाराम बाग येथून पत्रकार हेमेंद्र पाटील यांच्या चारचाकी गाडीतून बँगेची चोरी; तर चित्रालय येथे गाडीची काच तोडून महिलेची पर्स लंपास
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असुन मंगळवारी दुपारी बोईसर पोलिस ठाणे हद्दीत एकाच दिवशी दोन चारचाकी वाहनातून बँग व पर्स ची चोरी करून हजारो रूपयाचा ऐवज लंपास केला आहे. यातील एक घटना खोदाराम बाग जवळील इनहोम फर्निचर या भागात घडली असुन दुसरी घटना काही वेळातच चित्रालय येथील उत्सव हाँटेल च्या बाहेर घडली आहे. याबाबत बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी 24 तास उलटून देखील चोरट्यांचा तपास लागलेला नाही.
पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील हे आपल्या चारचाकी वाहनांने खोदाराम बाग येथील इन होम फर्निचर या दुकाना समोर वाहन उभे करून दुकानात 17 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास गेले होते. काही वेळातच पुन्हा आपल्या गाडीजवळ आले असता त्यांना दरवाजा उघडला दिसला यावेळी गाडीमध्ये पाहणी केली असता आँफिस बँग गाडीतून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या बँग मध्ये असलेला टँब, इतर वस्तू व कागदपत्रे असा एकुण 26 हजार 700 रूमाचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तातडीने हेमेंद्र पाटील यांनी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम व गुन्हा प्रगटीकरण शाखेचे सुरेश दुसाने यांना फोन करून माहिती दिल्यानंतर त्याठिकाणी पोलीस कर्मचारी देवा पाटील व आणखी एक कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही कॅमेरे ची माहिती घेतली. यावेळी टँब मध्ये असलेले सीमकार्ड चे लोकेशन तपासणी केली असता ते तातडीने बंद केल्याचे दिसून आले होते.
बोईसर खोदाराम बाग याठिकाणी झालेल्या चोरी नंतर साधारण दुपारी 1 वाजता चित्रालय उत्सव हाँटेल समोर उभ्या असलेल्या मानस पंडा यांच्या चारचाकी वाहनातून काच तोडून लेडीज पर्स चोरी करण्यात आली. लेडीज पर्स मध्ये 20 हजार रूपये असल्याचे तक्रारी मध्ये नमुद आहे. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये ही घटना कैद झाली असुन याबाबत बोईसर पोलिस तपास करत आहेत. हेमेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाण्यात कलम 379 व 427 प्रमाणे अज्ञात चोरांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.