◾️पत्रकार हेमेंद्र पाटील यांच्या चारचाकी मधुन तिन दिवसापूर्वी चोरीला गेली होती बँग; बोईसर ग्रामपंचायत स्वछता कर्मचारी यांना भैयापाडा स्मशानभूमी बाहेर असलेल्या कचरा कुंडीत आली आढळून
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: दोन दिवसापूर्वी खोदाराम बाग जवळील इनहोम फर्निचर या भागातुन चारचाकी मधुन चोरी झालेली बँग चोरट्यांनी कचऱ्यात फेकून दिल्याचे दिसून आली आहे. बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भैयापाडा स्मशानभूमी समोरील कचऱ्यात ही बँग फेकून दिल्याचे ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना आढळून आली. बँगेत मिळालेल्या एका पावती वरून त्यांनी फोन करून या बँगेची माहिती दिली. ही बँग बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिली असली तरी पोलिसांनी दोन दिवसात कोणताही तपास केला नसल्याचे देखील उघड झाले आहे.
बोईसर खोदाराम बाग येथील इनहोम फर्निचर या दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांच्या चारचाकी गाडीतून बँगेची चोरी 17 मे 2022 रोजी दुपारी झाली होती. या बँग मध्ये असलेला टँब, इतर वस्तू व कागदपत्रे असा एकुण 26 हजार 700 रूमाचा ऐवज चोरीला गेला होता. यातच चित्रालय येथील उत्सव हाँटेल समोर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाची काच फोडून महिलेली पर्स चोरण्यात आली होती. या पर्स मध्ये देखील 20 हजार रूपये होते. याबाबत बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे उत्सव हाँटेल च्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये चोरटे कैद झाले असताना देखील तिन दिवस उलटून देखील कोणताही ठोस तपास पोलिसांनी केलेला नाही. दाखल असलेल्या गुन्ह्यात दैनंदिन अहवाल नेमका काय सादर केला हा चौकशीचा भाग आहे. पत्रकारांच्या गाडीतून चोरलेल्या बँगे बाबत वृत्त देखील अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले होते.
बोईसर ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी नेहमी प्रमाणे आपल्या भागातील कचरा उचलण्यासाठी भैयापाडा स्मशानभूमी येथे गेले होते. यावेळी त्यांना कचऱ्यात एक बँग पडलेली दिसली. ती बँग त्यांनी उघडून पाहिली असता एक टँब, पालघर दर्पण उल्लेख असलेल्या डायऱ्या कागदपत्रे आढळून आले. यातच बँगेच्या बाहेर इतर वस्तू बाहेर फेकून दिलेल्या देखील आढळून आल्या होत्या. यातच बँगेत असलेल्या एका पावतीवर उल्लेख असलेल्या नंबरवर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी फोन करून कचऱ्यात बँग सापडली असल्या बाबत माहिती दिली. याबाबत पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांना साधारण 10: 30 वाजता फोनवर माहिती मिळाली होती. बँगेची माहिती मिळताच त्यांनी तपास अधिकारी यांना फोन करून कळवले मात्र ते ठाणे येथे शासकीय कामासाठी गेले असल्याने याबाबत माहिती देण्यासाठी व घटनास्थळी पोलिस पाठविण्यासाठी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांना पोलीस ठाण्यात जाऊन कळविले असता घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून मुद्देमालाचा जप्ती पंचनामा करून बँग व त्यामधील वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
◾️ चोरट्यांनी बँगेची चोरी केल्यानंतर बँग कचरा कुंडीत फेकून त्यातील काही वस्तू बाहेर टाकल्या होत्या. भैयापाडा स्मशानभूमी समोर असलेल्या कचरा कुंडीत ही बँग रात्रीच्या वेळी किंवा सकाळी टाकली असल्याचा अंदाज येतो. यातच याभागात एका दुकाना समोर सीसीटीव्ही कॅमेरे असुन या बाबत तपास होणे गरजेचे आहे. मात्र विराज कंपनीच्या घडलेल्या गुन्ह्यात बोईसर पोलिस व्यस्त असल्याचे दिसून येत असल्याने इतर दाखल गुन्ह्यात पोलिस लक्ष कधी देतील हा मोठा प्रश्न आहे. गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी कोणताही तपास केला नसल्याने किंवा मनावर घेतले नसल्याने चोरटे मोकाटच आहेत.