“मरा तिथेच” आमदार श्रीनिवास वणगाने खलाश्यांना केले वादग्रस्त वक्तव्य; परराज्यात अडकलेल्या खलाश्यांन कडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यातील हजारो आदिवासी कामगार गुजरात मध्ये मोठ मोठ्या ट्राँलर्स व बोटीमध्ये खलाशी म्हणून काम करण्यासाठी जातात. मात्र अचानक कोरोनाचे संकट उभे राहिल्याने हजारो कामगार अनेक बंदरावरच अडकून पडले आहेत. अशाच एका खलाश्यांने मदतीसाठी पालघरच्या आमदारांना फोन केला असता आमदारांने चक्क खलाश्यांला अवार्च भाषेत शिव्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन मतदारसंघात तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी,उधवा,विक्रमगड भागातील हजारो आदिवासी कामगार रोजगारासाठी गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा, वेरावल, सुरत, मंगलुर आदी बंदरावरील बोटी व ट्राँलर्स मध्ये खलाशी म्हणून काम करण्यासाठी जात असतात. कोरोनामुळे संपूर्ण देश लाँकडाऊन असल्याने हजारो खलाशी विविध बंदरात अडकून पडले होते. वेरावल येथून नारगोल बंदरात आलेल्या 1800 खलाश्यापैकी गुजरात आणि दमण मधील कामगारांना त्यांच्या जिल्हा प्रशासनाने उतरवून घेत त्यांच्या घरी पाठवले होते. मात्र पालघर जिल्ह्यातील 500 ते 600 कामगारांना दडपशाहीचा वापर करीत पुन्हा वेरावलच्या बंदरात सोडण्यात आल्याचा प्रकार घडला होता. पालघर मधील काही खलाशी कामगार मंगलूर बंदरात अडकले असल्याने त्यांनी पालघर शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा यांना मदतीसाठी फोन केला मात्र अधिक प्रश्न खलाश्यांनी विचारल्यावर आमदारांचा तोलच गेला अन आमदारांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
राज्य सरकार देखील बंदरात अडकलेल्या खलाश्यांना आपल्या राज्यात आणण्यासाठी उदासीन आहे. यामुळे मंगलूर बंदरात अडकले असल्याने खलाशी कामगारांने पालघरचे आमदार श्रीनिवास वणगा यांना फोन करत आमच्या सुटकेसाठी आपण व आपले सरकार काय प्रयत्न करीत आहेत का?, गुजरात राज्यातील कामगारांना मंगलूर येथून बस द्वारे आपल्या घरी पाठविण्याची रिस्क त्यांचे सरकार घेते,आपले सरकार आमच्या साठी रिस्क का घेत नाही, तुम्ही आमच्या सुटकेसाठी काही प्रयत्न करीत असल्याचे न्यूज मध्ये कुठेच दिसून येत नसल्याचा प्रश्न कामगारांनी उपस्थित करताच आ.वणगा चा पारा चढत त्यांचा तोल ढासळला. त्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत “मग मरा तिकडेच, त्यासाठी मला फोन केला का भडव्या?..तुझ्या आयचा……. असे चक्क आई वरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केल्याचा प्रकार घडला आहे. यातच आमदारांने शिविगाळ केलेली रेकॉर्डिंग क्लिप सोशल मीडिया द्वारे सर्वत्र फिरू लागल्यावर आमदारांनी ही आपला खुलासा सोशल मीडियावर पाठवला. त्यात माझ्याशी बोलणारा व्यक्ती हा खलाशी नसून तलासरी च्या पाड्यात बसून मद्यपान करून माझ्याशी बोलत आहे.सदर व्यक्तीने षडयंत्र रचून मला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचल्याने मी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याचा खुलासा पाठवत सारवासारव करण्याचा प्रयत्न आमदारांनी केला आहे.
◾ आमदारकी पदरात पडली पण हवा डोक्यात गेली
शिवसेनेने श्रीनिवास वणगा ला आपल्या कडे खेचून आणत भाजपची कोंडी केली होती. मात्र लोकसभेत मतदारांनी श्रीनिवास ला नाकारले होते. भाजप मधुन आणलेल्या श्रीनिवासचे पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांनी पालघरच्या मतदारांना गृहीत धरून व शिवसेना भक्कम असल्याने श्रीनिवास निवडून आले. कुठलेही कर्तृत्व, सामाजिक कार्यात फारसा सहभाग नसलेल्या श्रीनिवास पालघरचे आमदार झाले. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात देखील श्रीनिवास कुठे मदतीसाठी फिरल्याचे दिसुन आले नाही. असे असताना जेव्हा आपल्या जिल्ह्यातील मतदारसंघातील एखादा परराज्यात अडकलेला खलाशी कामगार मदतीसाठी संपर्क साधतो तेव्हा सत्तेची हवा डोक्यात गेलेले आमदार अर्वाच्य भाषेत शिव्या घातल असल्याने आपण चुकीच्या व्यक्तीला मतदान केले अशी भावना सर्वसामान्य मतदारांच्या मनात येत असेल हे नक्कीच यामुळे पक्षप्रमुख व आता मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची काय कान उघडणी करतात हेच पाहावे लागणार आहे.