◾️सुभाष पाटील, माया उर्फ महर्षी काठे सह इतर आरोपी फरार
◾️पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांना बातमी बाबत विचारले असता वर्दीचा धाक दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांवर बोईसर पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षा नंतर याकडे बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी विशेष लक्ष दिल्याने सुर्वे टोळीला जेलबंद करण्यात आले आहे. तरूणांला मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मुख्य दोन आरोपी व इतर आरोपी अद्यापही फरार आहेत.
बोईसर पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी 17 मे 2022 मुबारक खान या युवकाला मधुर हाँटेल च्या परिसरात बेदम मारहाण करून त्याला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याला यशवंतसृष्टी येथे रेल्वे धक्या जवळ असलेल्या साईबाबा मंदिर भागात नेण्यात आले होते. याठिकाणी देखील त्याला मारहाण करून सायंकाळी पर्यंत डांबून ठेवले होते. येथून या जखमी युवकांने आपला जीव वाचवत येथून पळ काढत बोईसर पोलिस ठाणे गाठले होते. यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचा प्रकार घडला होता. याबाबत पत्रकारांनी आवाज उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलिस उपधिक्षक नित्यानंद झा यांनी तपास आपल्या कडे घेत आरोपींना तातडीने ताब्यात घेतले होते. अटकेत असलेले निलेश सुर्वे, सोनु भोसले, विनोद माने, अन्या, काळु अशा आरोपींना 19 तारखेला पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना 18 मे रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दुपारी बोईसर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी सुरू असतानाच दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास निलेश सुर्वेला पुन्हा पोलिस ठाण्याच्या बाहेर आणण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्याच्या बाहेर असलेल्या दुचाकी वाहन शेड जवळ निलेश सुर्वेचा जप्त केलेला आयफोन मोबाईल पोलिसांनी दिला यावेळी समोरच्या व्यक्तीला सुर्वे यांने फोन करून “वहासे हटा देना काँन्टेक मे रहना” असे वाक्य बोलुन फोन ठेवला त्यानंतर गुन्हेप्रगटीकरण शाखेचे दोन कर्मचारी दुचाकीवरून निलेश सुर्वेला पोलीस ठाण्याच्या बाहेर घेवून गेले. असल्याची खात्रीशीर धक्कादायक माहिती पालघर दर्पणला सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलिस उपधिक्षक नित्यानंद झा यांनी याबाबत वस्तुस्थिती तपासणी करून सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे सुर्वे सारख्या गुन्हेगारी इसमाला ताब्यात घेतल्यानंतर मोबाईलवर बोलण्याची मुभा कोणी दिली हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निलेश सुर्वे या आरोपीला पोलिसांनी जप्त केलेल्या त्याचा फोन हातात देवुन फोन वरून संभाषण करण्यासाठी विशेष सवलत दिली. याबाबत बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांना व्हाट्सएप वर संदेश पाठवून व प्रत्यक्षात फोन करून वस्तुस्थिती विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलताना आपल्या वर्दीचा धाक दाखवत सांगितले की, पोलिसांना अधिकार आहे कोणाला काय फोन वर बोलु द्याव तो आपचा तपासाचा भाग आहे. तसेच तुम्ही ही बातमी करता याचे आश्चर्य वाटतं, पण एक लक्षात ठेवा “सौ सोनार की एक लोहार की” असे सांगुन पोलिसी खाक्या दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तसेच मी झा साहेबांना भेटून बोललो आहे तुम्ही जे काही मँसेज केला त्याबाबत तुम्हाला जी बातमी घ्यायची आहे ती तुम्ही घेवु शकता असे सांगितले आहे. यामुळे योगेश खोंडे हे महाशय निलेश सुर्वे प्रकरणात एवढे हताश होऊन एक प्रकारे निलेश सुर्वेला मोबाईलवर बोलण्याची दिलेली मुभा याबाबत कबुली दिली आहे. यामुळे आता वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करायला हवी. तसेच सुर्वे हा त्यावेळी समोरच्या व्यक्तीला काय हटवायला सांगत होता हा चौकशीचा महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुभाष पाटील, दिपक बिहारी, माया उर्फ महर्षी काठे, सुमित उडिया, अशरफ उर्फ अजू हे व इतर अनोळखी आरोपी अद्यापही फरार असताना त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही.
◾️बोईसर शहरात अमली पदार्थ विक्री करणारा निलेश सुर्वे या माफियाला बोईसर पोलिसांनी आजवर अनेकदा मोकळीक दिल्याचे दिसून आले आहे. या सुर्वे विरोधात स्थानिक नागरिकांनी बोईसर पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारी मध्ये बोईसर पोलिस ठाण्याचे गुन्हेप्रगटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर यांनी बनावट पंचनामा व कागदोपत्री बनावट तपास केल्याचे उघड झाले होते. यातच याच प्रकरणात आणखी दाखल असलेल्या इतर तक्रारी अर्जावर कोणत्याही प्रकारचा तपास पोलिस उपनिरीक्षक खोंडे यांनी केलेला नाही. पहिल्या अर्जावर चौकशी झाली आहे असाच अहवाल सादर करण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. यामुळे निलेश सुर्वे या गुन्हेगाराला बोईसर पोलिसांनी आजवर दिलेले आंदन यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
◾️ स्थानिक पत्रकारांनी पोलिस कंट्रोल रूमला दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल 2022 रोजी बोईसर पोलिसांनी साधारण 3 किलो गांजा ताब्यात घेतला होता. याच वेळी ताब्यात घेतलेल्या आरोपी सोबत निलेश सुर्वे याचा वारंवार मोबाईल वरून संपर्क असल्याचे व गांजाचा साठा हा निलेश सुर्वेचा असल्याचे पोलीस तपासणी मध्ये दिसून आले होते. त्यानंतर पत्रकारांनी केलेल्या पाठपुरावा नंतर सुर्वेला ताब्यात घेण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास देखील योगेश खोंडे यांच्या कडे होता. याच सुर्वेची जामिनावर सुटका झाल्यानंतर महिनाभरात त्यांने तक्रारदार याला केलेली बेदम मारहाण हा गंभीर प्रकार आहे.
◾️7 एप्रिल 2022 रोजी पकडण्यात आलेला गांजाचा साठा हा निलेश सुर्वे व त्याच्या टिमने नेमका कुठून आणला त्याचे धागेदोरे तपास अधिकारी यांनी शोधले का हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.