◾ बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत ५० पेटीची बोली?
◾️भाजपा कडून देण्यात येणारा सर्वसामान्य उमेदवार अखेर अपक्ष म्हणून रिंगणात
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बोईसर ग्रामपंचायत आता चाळ माफिया कब्जात घेण्याच्या तयारीत आहेत. यातच शिंदे गटाच्या नेत्यांनी एका पैशाने भक्कम असलेल्या व सरकारी जागेवर चाळीचे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना पाठिंबा दिला असल्याने येणाऱ्या काळात बोईसर मध्ये विकासाच्या जागी भकास झाल्यास त्यात काही नवल वाटण्यासारखे नाही. यातच भाजपाने पुढे केलेला सर्व सामान्य उमेदवाराला शिंदे गटातील भावी उपसरपंचाने विरोध केल्याचे देखील समोर आले आहे.
बोईसर ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी 10 नामनिर्देशन दाखल झाले होते. यातील तडजोडी नंतर फक्त तिन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात दाखल झाले आहेत. मात्र शिंदे भाजप सरकार या निवडणुकीत युती मध्ये असल्याने त्यांनी पाठींबा जाहीर केलेल्या उमेदवारांने आजवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आदिवासी व सरकारी जागेवर केली आहेत. ऐन निवडणुकीत इतर उमेदवारांना दबावतंत्र वापरण्यासाठी पालघर तहसीलदार यांनी काढलेल्या नोटीसा मात्र शिंदे गटातील चाळ माफियांना का काढल्या नाही असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत साम दाम दंड भेद अशा सर्व प्रकारे दबावतंत्र वापरून निवडणूक जिंकून आणण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न करून बोईसरचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. यातच येथील गुडघ्यावर उपसरपंचाचे बाशिंग बांधून बसलेला शिंदे गटाचा मोरक्यांने पालघर तलसीलदार याला हाताशी घेवुन सर्वसामान्य नागरिकांन मधुन येणाऱ्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रिये पासून दुर ठेवण्याची चाल यशस्वी केली आहे.
शिंदे गट व भाजप युती बोईसरच्या ग्रामपंचायत निवडणूकीत दिसून येत असली तरी भाजपा सोबत असलेली शिवशक्ती संघटना देखील या निवडणूक मध्ये या भकास युती सोबत का गेली असा सवाल उपस्थित होत आहे. सुरूवातीला आपली ताकद दाखवत भाजप व शिंदे गटाला घाम फोडणारी संघटना अचानक युती मध्ये सहभागी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाकडून आग्रह धरला जात असलेल्या थेट सरपंच उमेदवार हा 50 पेटी खर्च करणार असल्याचा दावा गुडघ्यावर बाशिंग बांधलेल्या भावी उपसरपंच यांनी केला होता. यातच भाजपाने याला सुरूवातीला विरोध देखील केला मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डोक्यावर घेतलेल्या उमेदवारांला भाजपाने दुर करत नापसंती असलेल्या उमेदवारांला खांद्यावर घेतले आहे. विशेष महत्त्व भाजप मधुन उमेदवारी नाकारलेल्या सर्वसामान्य उमेदवारांने सत्ताधारी विरोधात सर्वसामान्य असा लढा उभा केला आहे. यामुळे बोईसरची निवडणूक अधिकाच रंजक ठरणार आहे.