पाणी दूषित होऊन जीवितहानी होण्याची शक्यता; मासेमारीच्या जीवघेण्या प्रकाराने संताप
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: नदी मध्ये एकेकाळी फक्त जाळी टाकुन केली जाणारी मासेमारी आता जीवघेण्या प्रकार केली जात असल्याचे दिसून आले आहे. विक्रमगड आणि वाडा तालुक्यांच्या हद्दीवरून वाहत असणाऱ्या पिंजाळ नदीवरील कावळे येथील नदीपात्रात स्फोटके तसेच कीटकनाशकांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पाणी दूषित होण्या बरोबरच जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दगड फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या स्फोटकांच्या सहायाने तसेच शेतीमध्ये कीटकनाशक म्हणून वापरण्यात येणाऱ्या काही औषधांचा वापर काही समाजकंटक मासेमारीसाठी वापरत आहेत. या किटकनशांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात मासे व कोळंबी नदीच्या किनाऱ्यावर येऊन मरण पावते. हे मासे उचलून बाजारात विक्रीसाठी नेले जातात. मात्र अशा स्फोटकांच्या सहायाने आणि औषधांनी केलेल्या मासेमारीमुळे माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. त्याच बरोबर हे औषध नदीत टाकले जात असल्यामुळे नदीतील पाणीदेखील दूषित होते. ग्रामीण भागात हे पाणी नळ योजनांद्वारे घरोघरी पोहचवले जाते. तसेच शेतकऱ्यांची गुरेढोरे तसेच बकऱ्या-मेंढ्या देखील हेच नदीचे पाणी पिऊन आपली तहान भागवत असतात. मात्र मासे मारण्यासाठी अशी स्फोटके आणि कीटकनाशके नद्यांमध्ये टाकल्यास जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा अवैध मासेमारीला आला घालून भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळण्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. यातच कृषी दुकानातून शेतकऱ्यांन व्यतिरिक्त कीटकनाशके विकली जात असल्याने अशांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडुन केली जात आहे.
◾विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने प्राणघातक मासेमारी
पिंजाळ नदीच्या किनाऱ्याच्या अनेक ठिकाणांवरून विद्युत प्रवाहाच्या वाहण्या गेल्या आहेत.मात्र काही वेक्ती या विद्युत वाहण्याचा वापर हा मासेमारीसाठी करताना दिसत आहेत.अशा विद्युत प्रवाहाचा वापर करून मासेमारी करताना अनेक ठिकाणी नागरिक जखमी झाले आहेत तर काही जणांनी आपला जीव देखील गमावला आहे.
मासेमारी करण्यासाठी वायरच्या सहाय्याने चक्क पाण्यात विद्युत सप्लाय सोडला जात असून विद्युत सप्लाय काही वेळ पाण्यात सोडतात काही मिनिटांत हे मासे या सप्लायमुळे तडफडून मरतात. त्यानंतर विद्युत सप्लाय बंद करून मृत मासे हे बाहेर काढतात. असा प्रकार काही वर्षांपासून सुरू आहे. पाण्यात सोडण्यात येणारा सप्लाय अनेकांच्या जीवावर उठू शकतो. त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासनाने आणि विद्युत महामंडलाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी केली जातआहे.
◾ स्फोटके येतात कुठून
सध्या संचारबंदी असून कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे तरीही अशी स्फोटके येतात कुठून हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून जर ही स्फोटके खुलेआम मिळत असतील आणि जर हे एखाद्या मानसिक परिणाम झालेल्या रुग्णाच्या हाती ही स्फोटके लागल्यास मोठी जीवित हानी होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे.त्यामुळे अशी स्फोटके खुलेआम विक्री करणाऱ्यावर कठोर करावी करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
◾मासेमारीच्या जीवघेण्या प्रकाराने संताप
गेल्या अनेक वर्षापासून असे अवैध मासेमारीचे प्रकार सुरू असल्यामुळे परिसरातील शेतकरी तसेच नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धती कुणाच्याही जीवावरय उठू शकतात. त्यामुळे हा अघोरी प्रकार बंद करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
◾ कृषी दुकानदारांना कीटक नाशकांचा आणि इतर औषध विक्री करताना त्याची नोंद करून ठेवणे प्रशासनाने बंधनकारक करावे. जेणेकरून अशी कीटकनाशके टाकून मासेमारी केल्यास अशा समाजकंटकांचा तत्काळ शोध लागण्यास मदत होईल.त्याच बरोबर जीवघेणी स्फोटके विक्री करणाऱयांवर आणि अशी स्फोटके बाळगणाऱ्या लोकांवर आणि स्फोटकांच्या सहायाने मासेमारी करणाऱयांवर देखील कडक कारवाई करावी.
— केदार नाईक, सामाजिक कार्यकर्ते