◾ बाळासाहेबांची शिवसेना शाखेतील मुकबधीर मुलांला मारहाण करणारे भामटे मोकाट; तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पडळकर यांचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांन कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरातील बाळासाहेबांची शिवसेना शाखेतील मुकबधीर मुलांला मारहाण करून शाखेत बेकायदेशीर प्रवेश करून दरोडा टाकणारे आरोपी बोईसर पोलिसांच्या आशीर्वादाने अद्यापही फरार आहेत. पालघर सत्र न्यायालयाने देखील घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आरोपींचा जामीन नाकारला असला तरी बोईसर पोलिस आरोपींना मोकळीक देताना दिसत आहेत. घटनेला आता काही दिवसात महिना उलटून जात असताना देखील औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांन कडून दिवाळीच्या शुभेच्छा घेण्यासाठी व्यस्त असलेल्या सहाय्यक पोलिस निरिक्षकांना तपासासाठी वेळच मिळत नसल्याचा आरोप तक्रारदार यांच्या कडून केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांचे उपजिल्हा प्रमुख निलम संखे यांच्या ताब्यात बोईसर नवापूर नाका येथे शिवसेनेची शाखा कार्यालयात गावगुंडांनी दरोडा टाकला होता. बुधवारी 19 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4:50 वाजता संदीप शहा हा मुकबधीर मुलगा शाखा कार्यालय बंद करून जात असताना साधारण 10 लोकांनी एकत्र येऊन बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे कुलूप तोडले. यावेळी त्याठिकाणी आलेला शाखेतील कर्मचारी यांने विरोध केला असता त्याला मारहाण करण्यात आली होती. शाखेतील गोपनीय दस्तऐवज व साधारण 25 हजार रुपये सराईत गुन्हेगार घेवून प्रसार झाले होते. याबाबत बोईसर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेनेची असलेल्या शाखेचे कुलूप तोडून येथील मुकबधीर मुलांला मारहाण करून शाखेत प्रवेश करण्यासाठी सराईत गुन्हेगारांचा यामध्ये सहभाग होता. बोईसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुन्हेगारांचा मोरक्या मनोज संखे उर्फ बॉब, पंक्चर गॅगचा सराईत गुन्हेगार विजय प्रसाद उर्फ पंक्चर, संतोष सावंत व इतर सात अज्ञात व्यक्तींन विरोध गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या घटनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व त्यांच्या वर गंभीर गुन्हे दाखल असलेले इतरही आरोपींचा सहभाग होता. शाखेच्या दरोडा प्रकरणात दर्शन पाटील उर्फ पावडर, अजित मिश्रा, रोशन उर्फ लंगडा, संजीत मिश्रा उर्फ गोलू, अमोल मोरे यांचा समावेश असुन यातील काही आरोपी बोईसर पोलिस ठाण्याच्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार असताना देखील बोईसर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
बोईसर भागात गुंडगिरी करण्यासाठी आता टोळ्या गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय झाल्या असताना देखील त्यांच्यावर कोणतीही प्रकारची ठोस कारवाई आजवर करण्यात आली नाही. मनोज संखे उर्फ बॉब यांच्या सर्व गुन्हेगारी कामकाजात सहभागी असलेला विजय प्रसाद उर्फ पंक्चर हा येथील गुन्हेगार व नशा करणाऱ्या मुलांना एकत्र करून टोळी कार्यरत करत असुन या आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बोईसर पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक पडळकर यांच्या कडे घटनेचा तपास देण्यात आला होता. मात्र घटनेला जवळपास 16 दिवस उलटून जात असताना तसेच तपास अधिकारी यांच्या कडे आठवडा पेक्षा जास्त काळापासून पदभार दिला असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई प्रत्येक्षात आरोपींना पकडण्यासाठी केली नसल्याने दिसून आले आहे. विशेष म्हणजे दाखल असलेल्या गुन्ह्यात तपासाच्या दृष्टीने दैनंदिन अहवाल व त्याबाबत रोजच्या रोज स्टेशन डायरीत केलेली नोंद यांची तपासणी वरिष्ठ अधिकारी यांनी करणे गरजेचे आहे. फरार असलेला मुख्य आरोपी मनोज संखे हा सराईत गुन्हेगारांचा मोरक्या असून त्यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्याबद्दल गुन्हेगारांनी शुभेच्छा दिल्याचा फोटो सोशल मिडिया वर प्रसिद्ध देखील करण्यात आला आहे. मात्र तरीही बोईसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक याकडे दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक पडळकर यांना विचारणा केली असता आरोपींना मी ओळखत नसल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला शोधायला सांगतो असे बेजबाबदार उत्तर दिल्याने बोईसर मध्ये अशांतता निर्माण व्हावी असे मत पोलिसांचे आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
◾ आरोपींना फरार करणाऱ्या पोलिसांची चौकशी देखील नाही
बाळासाहेबांची शिवसेना शाखेच्या प्रकरणी घडलेल्या घटनेत सराईत गुन्हेगार घटनेच्या दिवशी बोईसर पोलिस ठाण्यात उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या सोबत गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोज संखे हा त्याठिकाणी होता. पोलिस ठाण्याच्या आवारात गुन्ह्यात नोंद असलेले आरोपी उपस्थित असताना देखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नव्हते. सराईत गुन्हेगार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांचा खबरी विजय प्रसाद उर्फ पंक्चर व खुनाचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार अजित मिश्रा हा देखील त्याठिकाणी होता हे सर्व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांचे हस्तगत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
◾ सराईत गुन्हेगारांचा सुरेश साळुंखे सोबत संबंध कसा
विजय प्रसाद उर्फ पंक्चर व त्यांचे साथीदार असलेला अजित मिश्रा या गुन्हेगारांने काही महिन्यांपूर्वी भैय्या पाडा येथे एका मुलांच्या छातीत चाकू मारला होता. यावेळी या आरोपींवर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या मदतीने आरोपी विजय प्रसाद उर्फ पंक्चर यांने फरार ठेवला होता. याच गुन्ह्यांत आरोपींना योग्य वेळी अटक दाखवून गुन्ह्यात वापरलेल्या गुन्हेगारी कामात वापरला जाणारा धारधार मोठा चाकू वापरला होता. मात्र गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठी बाजारातुन साधारण चाकू तपासात पोलिसांनी जप्त करून घेतला होता. यामुळे तपासाचा भाग म्हणून फिर्यादी वर झालेला चाकू हल्ला तो चाकू कितपत शरीरात गेला होता. त्याबाबत किती टाके पडले होते याची सखोल चौकशी झाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या वर कारवाई होऊ शकते.