◾बोईसरच्या सरोवर हॉटेल खाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे शासकीय वाहन; एका खोलीत १० लोकांचा धिंगाणा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारू पार्टी बोईसर च्या एका खाजगी हॉटेल मध्ये जोमाने सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेली तळीरामांचा धिंगाणा रात्रभर सुरू होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांचा देखील समावेश येथील बेकायदेशीर खोलीत होता. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची कायदेशीर रूम बुकिंगची नोंद करण्यात आली नव्हती. महत्वाचे म्हणजे दारू पिण्यासाठी हॉटेल मध्ये जाण्यासाठी शासकीय वाहनांचा वापर करण्यात आला होता.
दारूच्या अड्डयावर शासकीय वाहनाने प्रवास करून बेकायदेशीर पणे रात्रभर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व इतर मुख्य सदस्यांचा धिंगाणा सुरू असल्याची धक्कादायक घटना बोईसर मध्ये उघडकीस आली आहे. बोईसरच्या हॉटेल सरोवर मध्ये मंगळवारी रात्री ७ वाजता नंतर सुरू झालेली तळीरामांची नववर्षाच्या स्वागताची पार्टी रात्रभर सुरू होती. विशेष म्हणजे या पार्टीत काही शासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. सरोवर हॉटेल मध्ये दुसऱ्या मजल्यावर रूम नंबर २१० मध्ये जिल्हा परिषद सदस्य व लोकप्रतिनिधी यांचा धिंगाणा सुरू असताना याबाबत खात्रीशीर माहिती पालघर दर्पण च्या हाती लागली. साधारण १० इसम याठिकाणी रूम मध्ये उपस्थित असताना दोन बाटली ओकस्मिथ गोल्ड व्हिस्की व सुरूवातीला किंग फिशर माईल्ड ६ बिअर चा नजराणा दाखविण्यात आला होता. दारू पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या हॉटेलच्या रूमची कोणत्याही प्रकारची नोंद हॉटेल मालकाने रजिस्टर मध्ये केलेली नव्हती. जनतेच्या पैशातून जिल्हा परिषद उपाध्यक्षांना दिलेले शासकीय वाहन चक्क सायंकाळी दारूच्या ठेक्यावर जावुन थांबत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.