◾ पोलिस अधिकाऱ्यांच्या नकलत केली जातात का बेकायदेशीर कामे
◾ आनंद मेळाव्यात जुगार चालवला जात असल्याने पोलिस याठिकाणी गेले का?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात ग्रामपंचायतीच्या करामती मुळे जुगार मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर रविवारी सायंकाळी पासुन यासाठी मेळाला सुरूवात झाली. याच वेळी रिंग टाकून रक्कम जिंकण्याच्या खेळा कडे बोईसरचे दोन पोलिस पोचले. बराच वेळ याठिकाणी उभे राहिल्यावर जुगार सुरू आहे का असे आयोजकांना विचारल्यावर आपला खिसा गरम करून दोघं देखील माघारी फिरले. विशेष म्हणजे दोन्ही पोलिस हे आपल्या वर्दी वर याठिकाणी उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
पालघर दर्पण ने बोईसर ग्रामपंचायतीने दिलेली जुगार मेळाव्याला परवानगी बाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. यातच रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या मेळ्या कडे पालघर दर्पण चे लक्ष लागुन होते. याच दरम्यान ११२ मदत कक्षाची शासकीय युनिकॉर्न दुचाकी बोईसर सर्कस मैदानात रात्री आठ वाजता च्या दरम्यान आली आणि त्यावर चौधरी व पवार नावाचे दारूच्या धुंदीत दोन पोलिस आले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या एका इसमासोबत ते रिंग टाकून रोकड रक्कम जिंकण्यासाठी असलेल्या खेळाजवळ गेले. सोबत असलेल्या इसमाच्या नावाने चौधरी नावाच्या पोलिसांने याठिकाणी मेळा चालविणाऱ्या महिलेला सांगितले “तुमच्या विरोधात तक्रार आहे जुगार चालवला जात आहे”. यानंतर चौधरी सोबत असलेल्या इसमाचे व पवार नावाच्या पोलिसांनी आपले खिसे गरम करून अर्धातासात तेथून प्रसार झाले. विशेष म्हणजे याठिकाणी गेलेले दोन पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गेले होते की, ११२ नंबर वर कोणी तक्रार केली होती याबाबत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
रात्रीच्या वेळी नागरीकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस दारूच्या धुंदीत बोईसर मध्ये फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी पोलिस कर्मचारी पवार व चौधरी यांची तातडीने रक्त तपासणी करून दारूच्या धुंदीत फिरत असलेल्या पोलिसांवर कारवाई करणे गरजेचे आहे. बोईसर सर्कस मैदानात सुरू असलेल्या मेळ्यात दोन पोलिस कर्मचारी पवार व चौधरी यांनी केलेली तडजोड याबाबत बोईसर पोलिसांनी खुलासा करणे गरजेचे आहे. जर याठिकाणी मैदानात अवैध काम सुरू होते, याबाबत तक्रार होती तर याबाबत पोलिसांनी ठाण्यात जाऊन नोंद घेतली का? किंवा याबाबत अधिकाऱ्यांना कल्पना दिली याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. पालघर दर्पण कडे खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही पोलिसांनी सर्कस मैदानात सुरू असलेल्या मेळ्यात वसुली साठी गेल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस उपस्थित असलेले छायाचित्र देखील समोर आले असल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बोईसरच्या पोलिस निरीक्षक यांनी अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
◾पालघर दर्पणचे पोलिस अधिकाऱ्यांना सवाल.
१) सर्कस मैदानात गेलेले दोन पोलिस यांच्यावर दारू पिऊन वर्दीवर असल्याचा नागरिकांनी आरोप केल्याने. या दोन्ही पोलिसांची तातडीने वैद्यकीय तपासणी करावी.
२) सर्कस मैदानात जुगार सुरू असल्याबाबत तक्रार आल्यावर पोलिस याठिकाणी आल्याचे सांगत असल्याने याबाबत खुलासा करावा.
३) रिंग टाकून रोकड रक्कम जिंकण्यासाठी असलेल्या खेळाजवळ पोलिस नेमके काय करत होते. या सर्व मुद्यांवर बोईसर पोलिसांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
◾बोईसर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सर्कस मैदानात गेलेले असताना याठिकाणी ते दारूच्या नशेत गेले असल्याचा आरोप करण्यात आला होता. व इतर सर्व विषयाबद्दल बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांना विचारले असता याबाबत चौकशी करून माहिती घेतो असे पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले.