विराज प्रोफाइल कारखान्याला प्रशासनाची मोकळीक
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यात लाँकडाऊन वाढवले आहे. यातच मुंबई, ठाण्या बरोबर पालघर देखील रेड झोन मध्ये टाकल्याने पालघर वासीयांना अधिकच खबरदारी घ्यायची आहे. असे असले तरी तारापुर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने अत्यावश्यक सेवेत येत नसताना देखील सुरू असताना देखील जिल्हा प्रशासनाने देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे.
लाँकडाऊन नंतर औद्योगिक क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा देणारे कारखाने वगळता इतर शेकडो कारखान्यांनी आपले उत्पादन बंद ठेवले होते. याच काही कारखानदार कोणत्याही प्रकारची प्रत्येक्षात अत्यावश्यक असणारी उत्पादने घेत नसताना देखील प्रशासनाने अशा बड्या कारखानदारांना मोकळीक दिली होती. औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल कारखान्यांने बेकायदेशीर पणे आपला कारखान्या सुरू ठेवला होता. याबाबत अनेकांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करून देखील या कारखान्याला बंद करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी यांनी तर कारखाने सुरक्षा विभाग व एमआयडीसी यांना पत्र देवून अहवाल मागवल्याचे सांगत कारखान्याला सुट दिल्याचा आरोप नागरीकांन कडुन अनेकदा केला जात होता. मात्र दिवसेंदिवस विषय वाढत चालल्याने अखेर जिल्हाधिकारी यांनी कारखाना बंद करण्याचे आदेश दिले.
संचारबंदी असताना एखाद्या सामान्य नागरीकांवर संचारबंदीचे उल्लंघन झाले म्हणून पालघर जिल्ह्यात पोलिसांनी शेकडो गुन्हे काही दिवसातच दाखल केले. मात्र बेकायदेशीर पणे विराज कारखाना सुरू असताना प्रशासनाने एकही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. बड्या उद्योजक असलेल्या विराच प्रोफाइल कारखान्याला मोकळीक देत त्यांची वाहने देखील खुलेआम पणे रस्त्यावर फिरत होती. कामगारांच्या बस मध्ये प्रमाणापेक्षा अधिक कामगार भरून आणले जात होते. तरी जिल्हा प्रशासनाने याकडे अजिबात लक्ष दिले नाही. पालघर जिल्हाधिकारी यांनी विराज कारखान्याला बंदचे आदेश दिल्यानंतर देखील मुजोर कारखानदारांने आपले उत्पादन सुरूच ठेवले होते. यातच संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून अशा कारखानदारावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना मात्र पालघर जिल्हाधिकारी यांनी दिलेले उत्पादन बंदचे आदेश म्हणजे फक्त आपले अंग काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे.
◾ विराज कारखान्यात दोन कामगारांची प्रकृती अचानक बिघडल्याने कारखाना व्यवस्थापकाने त्यांना आपल्या मालकीच्या बोईसर येथील अमृत रेसिडेंसी इमारती मध्ये ठेवले होते. याबाबत स्थानिकांना कळताच त्यांनी शनिवारी सायंकाळी एकच गोंधळ घालत त्या कामगारांना त्याठिकाणाहुन हरविण्याची मागणी केली. याच वेळी जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने त्या रुग्णांना तपासणी करून त्यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे सांगितले. मात्र त्यांना इतरांन पासुन दुर विलीनीकरण करून ठेवण्याचे सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हजारो कामगार असलेल्या विराज कारखाना व औद्योगिक क्षेत्रातील इतर कारखान्यात बाहेरून येणाऱ्या कामगारांन मुळे जिल्हा धोक्यात येण्याची शक्यता असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते हा मोठा प्रश्न आहे.
◾ जिल्ह्याच्या सिमा खुल्याच!
पालघर जिल्हा प्रशासन जिल्ह्यात कोणीही येणार नाही याची खबरदारी घेत असल्याचा कांगावा करत असले तरी पालघर मध्ये चोरट्या पध्दतीने कामगारांना आणले जात आहे. असाच प्रकार शनिवारी पालघर तालुक्यातील किराट भागात घडला असुन याठिकाणी भिवंडी येथुन विट्टभटी वर काम करण्यासाठी तब्बल 22 कामगार आणण्यात आले होते. यातच मालवाहू ट्रक मधुन मुख्य रस्त्यावर असलेल्या चौक्या तपासणी नाके असताना देखील एवढी माणसे कशी आली यावरून येथील तपासणी नाक्यावरील सुरक्षतेचा अंदाज येतो.