◾पालघरचा तलाठी महेशकुमार कचरे याला दहा हजाराची लाच घेताना अटक; चहाडे येथील एका प्रकरणात जमीन खातेदार यांच्या फेरफारकामी पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
◾ बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयाचा नंबर कधी?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: तालुक्यातील लाचखोरीचे वाढलेले प्रमाण पुराव्यानिशी सिद्ध झाले असून तहसीलदार यांचा लाचखोर तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघर येथे रंगेहाथ अटक केली आहे. या लाचखोर तलाठ्याला तहसीलदार यांनी चहाडे, आल्याळी, शिरगाव व मासवण येथील क्रीम परिसराचा पदभार दिला होता. आता हाच तहसीलदारांचा वफादार लाच घेताना रंगेहाथ सापडला असल्याने पालघर मध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण असलेल्या पालघर तालुक्यात तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याने लाचखोरीची घटना पुराव्यानिशी समोर आली आहे. पालघर तहसीलदार यांचा वफादार लाचखोर तलाठी महेशकुमार कचरे यांने चहाडे येथील एका प्रकरणात जमीन खातेदार यांच्या फेरफारकामी पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत तक्रार पालघरच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती. यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर येथील शुक्ला कंपाऊंड परिसरात साफळा रचला होता. यावेळी दहा हजाराची लाच तलाठी कचरे यांनी स्वीकारली व आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास व विलास भोये, योगेश धारणे, संजय सुतार, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा यांच्या टीमने सिने स्टाईलने पाठलाग करून “कचरा” ताब्यात घेतला असुन याबाबत पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◾ लाचखोर महेश कचरे यांने आजवर काम केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना वेठीस धरले असल्याने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने नागरीकांनी खरमरीत टीका करून आनंद व्यक्त केला आहे.
◾ बोईसरचा नंबर कधी?
बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयात नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांन विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी समोर येत आहेत. अनेक प्रकरणांत संधी शोधण्याचा प्रयत्न मंडळ अधिकारी यांच्या कडून केला जात आहे. येथील गारगाव येथील जमीन घोटाळा प्रकरणात मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांच्या पाठिंब्यावर मोठी संधी शोधण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात असल्याने दलांना पुढे करून वसुली केली जाते. तारापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई मध्ये पकडला खाजगी इसम याठिकाणी अधिकाऱ्यांची वसुली करत असल्याने याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. यामुळे बोईसरचा नंबर कधी लागणार याबाबत आता पाहत राहणे औचित्याचे ठरणार आहे