- तारापुर औद्योगिक क्षेत्रातील गॅलेक्सी सरफॅक्टटंट कारखानदारांच्या हलगर्जीपणा मुळे कामगारांचा दुदैवी अंत
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात भिषण अपघात झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असुन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातच दोन जखमी असलेल्या कामगारांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्फोट झाल्याचे कारण समोर येत असले तरी उत्पादन प्रक्रिया घेत असताना योग्य प्रकारे देखरेख केली नसल्याने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील गॅलेक्सी सरफॅक्टटंट प्लाँट नंबर- एम 3 या रासायनिक कारखान्यात साबण व हँडवाँश उत्पादनाचा कच्च्या माल बनवला जातो. सोमवारी दुपारी 11:30 च्या दरम्यान भिषण झालेल्या स्फोटात कारखान्यांचे पर्यावेक्षक समीर खोजा (44)रा. पालघर, आँपरेटर विजय सावंत(48) रा. पास्थळ यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला कामगार रुणाल राऊत याला उपचारासाठी मिरारोड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करताच डाँक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामध्ये अखिल घरत व कुणाल राऊत हे किरकोळ जखमी झाले आहेत. कारखान्यात ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी 47 कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
गॅलेक्सी सरफॅक्टटंट या रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी उत्पादन प्रक्रिया सुरू होती. सकाळी 11:30 च्या दरम्यान उत्पादन प्रक्रिया सुरू असताना रियाक्टर रिसिव्ल मध्ये धुर निघाल्याने कारखान्यात असलेले फायर सायरन वाजायला लागला. यावेळी याठिकाणी एकही कामगार किंंवा अधिकारी उपस्थित नव्हते. फायर सायरन वाजताच खालती असलेले पर्यावेक्षक समिर खोजा व विजय सावंत याठिकाणी पाहण्यासाठी आले तेवढ्यात रियाक्टर रिसिव्ल चा स्फोट झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यातच याठिकाणी आलेला रुणाल राऊत हा देखील गंभीर जखमी झाला त्यांचे दोन्ही पाय, हात व इतर भागाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल करताच रुणाल राऊत यांने प्राण सोडले. कारखान्यातील रियाक्टर रिसिव्ल मध्ये हायड्रोजन पँरोसाईड हे रसायन होते. यातच अमाइड, हायड्रोजन पँरोसाईड, लँपाओ क्लीनसिंग याचा वापर करत असल्याची माहिती समोर येत आहे.
◾ रियाक्टर रिसिव्ल मधील हायड्रोजन पँरोसाईड मुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत आमचे अधिकारी तपासणी अहवाल सादर करतील त्यानंतर योग्य कारण समोर येईल. रियाक्टर मध्ये नेमके कोणते उत्पादन घेतले होते त्यांची माहिती घेत आहोत.
— अशोक खोत, संचालक कारखाने सुरक्षा विभाग