पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: डहाणू तालुक्यात आता कोरोनाने शिरकाव केला असुन तीन वर्षीय चिमुकल्या मुलीला करोना संसर्ग झाल्याचे तपासणी अहवालावरून पुढे आले आहे. या मुलीच्या थुंकीचे नमुने सुमारे आठवडाभरापासून चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्याचे अहवाल आठवडाभरानंतर उशिरा आल्यानंतर आता शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.
वीटभट्टी वर काम करणाऱ्या कामगाराची ही चिमुकली मुलगी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या मुलीच्या आई वढीलांना अलगीकरण करण्यात आले असुन त्यांच्यावर डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच आता कोरोनाची लागण डहाणू ग्रामीण भागात देखील दिसून आल्याने नागरीकांनी अधिकच खबरदारी घेणे गरजेचे आहे. लहानग्या चिमुकलीला कोरोनाची लागण नेमकी कशामुळे झाली हे शोधणे गरजेचे असुन मुलीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासन घेत आहे.