◾ औद्योगिक क्षेत्रातील बाँम्ब रेयॉन कारखान्यांने थकवला कामगारांचा पगार
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: लाँकडाऊन मध्ये औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद असल्याने कामगरांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाँकडाऊन दरम्यानचे वेतन कर सोडाच कामगरांना फेब्रुवारी महिन्याचा पगार देखील एका कारखान्यांने दिला नसल्याने शेकडो कामगार औद्योगिक क्षेत्रातील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालया बाहेर जमा झाले होते. मात्र पगार दिला जाईल असे सांगत पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील बाँम्बे रेयॉन या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा पगार थकवाला गेला हा विषय आता नेहमीचाच झाला आहे. प्रत्येक चार महिन्यात येथील कामगार रस्त्यावर उतरून आंदोलने करत असतात असाच प्रकार लाँकडाऊन मध्ये झाला असुन शेकडो कामगार चित्रालय भागात गुरुवारी सकाळच्या वेळी जमा झाले होते. लाँकडाऊन मध्ये कामगारांना भरून पगार द्यावा असे शासानाने कारखानदारांना आव्हान केले आहे. परंतु लाँकडाऊन मधला तर सोडाच बाँम्बे रेयॉन कारखान्यांने फेब्रुवारी महिन्यातला पगार थकविल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अचानक जमा झालेल्या कामगारांना बोईसर पोलीस एकमेकांन पासुन दुर थांबायला सांगत पोलिसांनी कामगार उपायुक्त यांची भेट घेतली.
पोलिसांच्या मध्यस्थी नंतर कामगार उपायुक्त यांनी कारखाना व्यवस्थापकाला तातडीने कामगारांना पगार देण्याचे दुरध्वनी वरून सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस सर्व कामगारांना आपापल्या घरी जाण्याच्या सुचना दिल्या. महत्त्वाचे म्हणजे बाँम्बे रेयॉन कारखान्यात वारंवार कामगारांची पिळवणूक होत असताना देखील कामगार विभाग अशा कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप कामगारांन कडुन केला जात आहे. यामुळे ऐन लाँकडाऊन मध्ये कामगारांचा पगार थकविणाऱ्या कारखानदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती साठी बाँम्बे रेयॉन कारखान्यांचे कारखाना व्यवस्थापक प्रकाश माळी यांना वारंवार संपर्क साधला असताना देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
◾ कामगारांना फेब्रुवारी महिन्यांचा थकवलेला पगार तातडीने देण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाला सुचना दिल्या आहेत. तसेच याबाबत लेखी पत्र देखील देण्यात येणार आहे.
— किशोर दहिफळे, कामगार उपायुक्त पालघर