◾लाँकडाऊन मध्ये रस्त्यावर जमाव करून गावकरी करत आहेत नको ती कामे; चोर असल्याच्या संशयावरून तिन प्रवाशांचा घेतला जीव
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: रस्त्यावर एखादा अनोळखी माणूस दिसला की तो चोर असल्याची अफवा पसरवली जात आहे. अवा अफावांमुळे तिन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्र शासित खानवेल कडे जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर थांबवुन गडचिंचले येथील समाजकंटक लोकांनी दगड व इछर प्राणघातक साहित्याने बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यातच काही दिवसापूर्वी सारणी येथे देखील पोलिसांवर व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना ही दुसरी घटना घडली आहे.
गावाचे रस्ते बंद करणे रात्रभर गावाच्या चौकात टाईमपास करत बसणाऱ्या टपोऱ्यांना प्रशासनाने देखील मोकळीक दिल्याने आता काही समाजकंटकांनी लोकांच्या जीवावर उठले आहेत. असाच काहीसा प्रकार गडचिंचले गावात घडला असुन गुरुवारी रात्री 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान दाभाडी – खानवेल मार्गावर नाशिक कडून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. प्रवास करणारे चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केल्याची माहिती पुढे आली आहे. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांन कडुन देण्यात आली असुन याठिकाणी गेलेल्या पोलिसांच्या वाहनांची देखील नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे.
लाँकडाऊन मध्ये रिकामटेकड्या लोकांनी आता नको ते प्रकार सुरू करण्यास सुरुवात केली आहे. गावाच्या वेशीवर जमाव करून जाणाऱ्या लोकांना मारहाण करण दगडफेक करणे असे प्रकार वाढत चालल्याने प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावात देखील असाच एक प्रकार घडला होता. सामाजिक कार्यकर्ते पेशाने डाँक्टर असलेल्या विश्वास वळवी यांना मारहाण करत त्यांच्या गाडीची नासधूस करण्यात आली होती. यावेळी घटनास्थळी गेलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक करून पोलिसांच्या गाडी फोडण्यात आली होती. यावेळी पोलिसांना देखील दुखापत झाली असताना अशा प्रकाराकडे प्रशासनाने विषेश लक्ष दिले नसल्याने पुन्हा झालेल्या सिमा भागात झालेल्या प्रकारात तिघांना जीव गमवावा लागला आहे.