◾कंपनीच्या आवारात ज्वलनशील पदार्थांचा व एफआरपी पदार्थांचा मोठा साठा
पालघर दर्पण: राजेंद्र पाटील
पालघर: मनोर मुख्य रस्त्यावर नेटाळी गावाजवळ वॉटर्स स्लाईड्स व अन्य क्रीडा साहित्य बनवणाऱ्या अरिहंत इंडस्ट्रिअल कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीला सोमवारी सव्वातीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या आवारात ज्वलनशील पदार्थांचा व एफआरपी पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळेतच रौद्ररूप धारण केले होते.
आग विझवण्यासाठी पालघर नगरपरिषदेचा व बोईसर अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. असून आगीचा फैलाव मोठ्याप्रमाणात झाल्यामुळे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. आग मोठी असल्याने आणि पालघर-मनोर मुख्य रस्त्याच्या कडेलाच असल्याने या मार्गावरील पूर्णतः वाहतूक काही तास बंद करण्यात आली होती. आगीचे लोळ मनोर पोलीस स्टेशन हद्दीपासून दूरदूरच्या गावांना दिसत होते. फायबरची खेळणी व वॉटर पार्कचे फायबर साहित्य तसेच हायट्रला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने कंपनीत कामगार वर्ग नव्हता. तसेच बाजूला नेटाळी गावाची वस्ती आणि भुलानी कंपनीतील कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच कंपनीला लागून एक फार्महाऊस आहे. आणि तो ही बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत जीवितहानी झाली नसून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत.