◾ बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावर कुडण येथे रस्त्यावर पडलेले दिसले 730 रूपये; पोलिसांनी पैसे ताब्यात घेतले
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: कोरोना मुळे काहीही घडले तरी त्यांचे अनेक तर्कवितर्क काढले जातात. असाच काहीसा प्रकार पालघर तालुक्यातील कुडण गावात घडला असुन याठिकाणी रस्त्यावर अचानक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पडलेले दिसुन आले. यामुळे भयभीत झालेल्या नागरीकांनी पोलिसांना बोलवत पोलिसांनी पैसे ताब्यात घेतले आहेत.
पालघर जिल्ह्यातील सद्या अफवांना उत आलेले असुन नागरीक अनेक तर्कवितर्क लढवित असतात. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावर कुडण ग्रामपंचायतीच्या समोरच्या भागात रस्त्यावर 730 रूपये पडलेले येथील लोकांना दिसून आले. पैशाला थुंकी लावुन ये पैसे कोणी समाजकंटकांनी टाकले असल्याची अफवा पसरल्याने अनेक लोक रस्त्यावर जमा झाले होते. मुख्य रस्ता असल्याने याठिकाणाहुन वाहनांची वरदळ सुरू असते यामुळे दुचाकीस्वाराच्या खिशातून पैसे पडले असल्याची शक्यता आहे. तारापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी याठिकाणी जावुन सुरक्षित पणे पैसे उचलून प्लास्टिक पिशवी मध्ये भरण्यात आले. सोशलमिडीयावर पसरल्या जाणाऱ्या अफवांमुळे पालघर जिल्ह्यात अनेक अनुचित प्रकार घडले असल्याने याअगोदर देखील अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.