पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: लाँकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या गरीब जनतेचे हालाकीचे दिवस असल्याने अनेक लोक मदतीसाठी धावुन आले आहेत. मात्र बोईसर भागात सद्या गरीबांना मदतकार्य केलेल्यांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकुन समाजसेवेची प्रसिद्धी मिळवली जात असल्याने दिसुन आले आहे.
बोईसर भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते गरीबांना रोजच अन्नधान्य दान करताना दिसुन येतात. मात्र काही राजकारणी यामध्ये देखील प्रसिद्ध मिळवताना दिसुन येत आहेत. असाच प्रकार सरावली ग्रामपंचायत हद्दीत घडला असून शिवभोजन थाळीचे फलक लावून पाच रूपयाच जेवण दिले जाईल असे फलक लावण्यात आले होते. मात्र शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रभाकर राऊळ यांनी जेवण वाटपाचे जोरदार फोटोसेशन करून फोटो समाजमाध्यमांवर टाकल्यांने एकच टिकेची झोड उठली आहे. लातूर जिल्हाधिकारी यांनी मदत कार्य करताना फोन न काढण्याचे आदेश दिले होते. याच प्रमाणे पालघर जिल्हाधिकारी यांनी देखील मदत कार्य करताना फोटो काढु नये असे आदेश द्यावे अशी मागणी नागरीकांन कडुन केली जात आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार वाटण्यात आलेले जेवण हे कोणत्याही शिवभोजन केंद्राचे नसुन फक्त फलक लावण्यात आला होता. यामुळे कोरोनाच्या लढाईत काही नेतेमंडळी आपला प्रचार करताना दिसत असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.