- बोईसर दलाल टाँवर भागातील 35 वर्षीय तरूणाला करोनाची बाधा; त्यांच्या संपर्कात आलेल्या 35 ते 40 लोकांचे होणार अलगीकरण
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: संचारबंदी जुगारून रस्त्यावर नेहमीच गर्दी असलेल्या बोईसर भागात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील 35 वर्षीय तरूणाला कोरोनाची बाधा झाली असुन त्यांचा तपासणी अहवाल पाँजिटिव्ह आला असलेल्या बोईसर मधील पहिला रुग्ण कोरोनाचा आढळून आला आहे.
कोरोनाने बोईसरमध्ये शिरकाव केल्याने प्रशासन जागे झाले आहे. बोईसर परिसरातील दलाल टाँवर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय तरूणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यांचा तपासणी अहवाल हा पाँजिटिव्ह आला असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या तरूणांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 35 ते 40 जनांचे अलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असुन हा तरुण राहत असलेल्या इमारती मधील 10 लोकांना तातडीने विलीनीकरण व तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा तरूण आपल्या वढीलांना उपचारासाठी मुंबई येथे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून संचारबंदी असताना तसेच पोलीस प्रशासन अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना देखील बोईसर भागातील लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत होते. यातच आता बोईसर मध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने नागरीकांनी खबरदारी घेणे आता तरी गरजेचे आहे.