◾ पालघर मुंबई प्रवास करणाऱ्या परिचारिकेला कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या 11 जनांचे अलगीकरण
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई पालघर प्रवास करणाऱ्या महिला परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याने पालघर शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रवासात या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे तातडीने विलगिकरण करण्यात आले असुन परिचारिका राहत असलेला परिसर पुर्णपणे सिल करण्यात आला आहे.
पालघरमधील मिशन कंपाऊंड येथील 57 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. पालघर हुन मुंबई प्रवास करणारी महिला परिचारिका बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई येथे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांन साठी पालघर येथून एसटी बसची सुविधा करण्यात आली होती. दररोज पालघर येथून मुंबई ला प्रवास करत असल्याने त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या 11 प्रवाशांचे अलगीकरण व घशाच्या नमुन्याची तपासणी पालघरच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. अलगीकरण करण्यात आलेल्यांन मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, बस चालक व कंडक्टर यांचा समावेश आहे. दरम्यान महिला परिचारिका राहत असलेला पालघर मधील परिसर पुर्णपणे सिल करण्यात आला आहे.