◾ बोईसर मध्ये कोरोनाचे नवीन तिन रुग्ण; बोईसर मधील पहिला 35 वर्षीय तरूणाच्या संपर्कात आलेल्या तिन नातेवाईकांना कोरोची बाधा
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: कोरोनाचा वाढता फैलाव बोईसर साठी चिंतेची बाब असुन दलाल टाँवर भागात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना लागण झालेल्या इसमाच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. बोईसर येथील पहिल्या करोना बाधीत रुग्णाला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले असून नव्याने संसर्ग आढळलेल्या रुग्णांना बोईसर टिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई प्रवास करणाऱ्या बोईसर येथील 35 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या 10 लोकांना आरोग्य विभागाने तातडीने ताब्यात घेऊन अलगीकरण करण्यात आले होते. तर इतर संपर्कात आलेल्या 35 ते 40 लोकांचा तपास सुरू करण्यात आला होता. मंगळवारी याच्या कुटुंबातील 12 वर्षीय मुलगा, तिन वर्षीय मुलगी व 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. बोईसर भागात मुख्य रस्ते बंद करण्यात आले असुन सर्व प्रकारची दुकाने बंद करण्यात आली आहेत. यातच इतर लोकांचे घेतलेले नमुने याचा अहवाल येणे बाकी असुन तिन लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास सुरू आहे.