पालघर दर्पण: वार्ताहर
डहाणू ग्रामीण: कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी,सरकारने केलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदी मुळे, गुजरात मधील दीव आणि वनकपाडा येथे अडकून पडलेल्या 1 हजार 696 खलाशाना,26 बोटी मधून रविवार डहाणू बंदरात सुखरूपपणे उतरविण्यात आले. आता यासर्व खलाश्यांची वैद्यकीय तपासणी करून कॉवारंटाईन करण्यात येणार आहे.
डहाणू येथे उतरविण्यात आलेले सर्व खलाशांची गुजरात मधील दिव,वनकपाडा येथे वैदयकिय तपासणी केली होती. मात्र आता पुन्हा त्यांना कॉवारंटाईन करण्यासाठी, डहाणूच्या सेंट मेरीज हायस्कूलमध्ये देण्यात येणार असून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात गुजरात राज्यातील, वेरावळ, पोरबंदर, सौराष्ट, मंगळूर,बंदरात अडकून पडलेल्या खलाशांचे, खाण्या पिण्याचे हाल होत होते. त्यांची गुजरात सरकार जबाबदारी घेत नव्हते,तर राज्य सरकार त्यांना डहाणू बंदरात उतरण्यासाठी परवानगी देत नव्हते. खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने खलाश्यांना डहाणू बंदरात आणण्यात आले आहे.