◾ संचारबंदीत खाजगी वाहनांना पेट्रोल व डिजेल विक्री बंद असताना देखील जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकावत केली पेट्रोल विक्री
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: कोरोनामुळे संचारबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडत असल्याने शासनाने खाजगी वाहनांना पेट्रोल व डिजेल विक्री बंद केली होती. मात्र पालघर तालुक्यातील नागझरी येथे एका पेट्रोल पंप मालकांने खुलेआम पणे इतर खाजगी वाहनांना पेट्रोल व डिजेल विक्री केल्याचे काही नागरीकांनी केलेल्या तक्रारी मध्ये दिसून आहे. यामुळे अशा संचारबंदी मध्ये शासनाचे आदेश धुडकावून लावणाऱ्या पेट्रोल पंप वर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागझरी म्हटलं की महसूल विभाग असो की इतर कोणताही विभाग याठिकाणी असलेले डोंगर पोखरून गब्बर झालेले माफिया सर्वच अधिकाऱ्यांना आपल्या मुठीत धरून ठेवत असल्याचे आजवर दिसून आले आहे. असाच काहीसा प्रकार संचारबंदी असताना पेट्रोल पंप बाबत घडला असुन संचार बंदीमध्ये खाजगी वाहनांना पेट्रोल देणाऱ्या पंप मालकावर येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकांन कडुन करण्यात येत आहे. संचारबंदी मध्ये खाजगी वाहनांना पेट्रोल डिजेल देवु नये व कोणी देत असेल त्याकडे स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांन लक्ष दिले जात होते. मात्र तरी देखील नागझरी येथील त्रिमूर्ती पेट्रोल पंप मालकांने अधिक पैशाच्या हव्यासापोटी शासनाचे सर्व नियम धुडकावून लावत बेकायदेशीर पणे पेट्रोल डिजेल रात्रीच्या वेळी देखील विक्री केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे.
संचारबंदी मध्ये सरकारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व प्रसार माध्यमे यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांना पेट्रोल डिजेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. तसेच पेट्रोल डिजेल देताना त्याची नोंद ही रजिस्टर मध्ये करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र तरीही नागझरी भागातील पेट्रोल पंप मधुन चोरट्या पध्दतीने पेट्रोल डिजेल इतरांना देखील दिले जात होते. यामुळे त्रिमूर्ती पेट्रोल पंप येथून मोठा पेट्रोल साठ्याची बेकायदेशीर पणे विक्री केली असल्याची माहिती समोर येत असल्याने अशा पेट्रोल पंप ची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यातच पेट्रोल पंप भागात असलेले सीसीटीव्ही कँमेरे तपासणी केल्यानंतर बेकायदेशीर पणे विक्री करण्यात आलेल्या साठ्याचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता महसूल विभाग व पुरवठा विभाग नेमकी काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.
◾ संचारबंदी असताना खाजगी वाहनांना पेट्रोल देणे बंद होते याकाळात जर पेट्रोल डिजेल इतरांना देण्यात आले असेल तर त्याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
— सुनील शिंदे, तहसीलदार पालघर