- ट्रेलर मधुन परराज्यात जाणाऱ्या 20 ते 25 कामगारांचा समावेश; ट्रेलर पलटी होताच सर्वांनी काढला पळ
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यातुन लोखंडी काँईल घेवुन जाणारा ट्रेलर मुकुट टँक वळण रस्त्यावर पलटी झाला. भरधाव वेगाने असलेल्या ट्रेलर वळण रस्त्यावर पलटी झाला असुन त्यामध्ये 20 ते 25 कामगार परराज्यात जाण्यासाठी याच ट्रेलर मधुन धोकादायक प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी याठिकाणी झालेली नाही.
औद्योगिक क्षेत्रातील एका स्टिल कारखान्यातुन लोखंडी काँईल घेवुन निघालेला टेलर भरधाव वेगाने असल्याने तो मुकुट कंपनीच्या वळण रस्त्यावर पलटी झाला आहे. रात्री 10 वाजताच्या सुमारास पलटी झालेला ट्रक मधुन परराज्यात जाणारे सुमारे 20 ते 25 कामगार धोकादायक प्रवास करत असल्याची माहिती प्रत्येक्षदर्शी यांनी दिली. ज्यावेळी टेलर पलटी झाला त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांनी ट्रेलर ची फुटलेली काच बाहेर काढुन मध्ये असलेल्या कामगारांना बाहेर काढले. हा मालवाहतूक करणारा ट्रेलर कलकत्ता रोड लाईन या कंपनीचा असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. यातच याठिकाणी चालक देखील फरार झाला असुन घटनास्थळी बोईसर पोलीस दाखल झाले आहेत.
◾ बोईसर परिसरातील शेकडो कामगार मजुर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक मधुन धोकादायक प्रवास करून आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी शुक्रवारी व शनिवारी वाहनांवर कारवाई करू सुध्दा अशा प्रकारचा धोकादायक प्रवास सुरू आहे. रविवारी रात्री पलटी झालेल्या ट्रेलर अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी ट्रेलर मधील कामगारांनी पळ काढल्याने कोणाला दुखापत झाली आहे की नाही याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती समोर येवु शकली नाही.