◾ कारखान्यात घातक रसायनाची अभिक्रिया झाल्यानंतर घडला होता भिषण स्फोट; कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यवस्थापक मिलिंद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: महिन्याभरापुर्वी तारापुर मधील गँलेक्सी कारखान्यात झालेल्या भिषण स्फोट प्रकरणात अखेर महिन्याभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्यांच्या व्यवस्थापकांने कामात हयगय करत निष्काळजीपणा केल्याने झालेल्या स्फोटात तिन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर कारखान्याकडून सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला होता. कामगरांचा बळी घेणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला असला तरी कायद्यातील पळवाटीमुळे आरोपी बिनधास्तपणे कारखान्यात वावरत आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील गॅलेक्सी सरफॅक्टटंट प्लाँट नंबर- एम 3 या रासायनिक कारखान्यात साबण व हँडवाँश उत्पादनाचा कच्च्या बनवणाऱ्या कारखान्यात व्यवस्थापकांच्या हलगर्जीपणा मुळे भिषण स्फोट झाला होता. कारखान्यात रविवारी 12 एफ्रिल रोजी रात्री उत्पादन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 13 एफ्रिल सोमवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमार रियाक्टर रिसिव्ल मध्ये धुर निघाल्याने कारखान्यात असलेले फायर सायरन वाजायला लागला. फायर सायरन वाजताच खालती असलेले पर्यावेक्षक समिर खोजा व आँपरेटर विजय सावंत याठिकाणी पाहण्यासाठी आले तेवढ्यात रियाक्टर रिसिव्ल चा स्फोट झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रुणाल राऊत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामध्ये अखिल घरत, प्रणित राऊत यांना गंभीर दुखापत झाली या घटनेला 13 मे रोजी एक महिला उलटला आहे. उशीरा का होईना तिन कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या गँलेक्सी कारखान्यांचे व्यवस्थापक मिलिंद पाटील यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारखाना सुरक्षा विभागाने चौकशी होऊन देखील पोलीस ठाण्यात महिना उलटून जात असताना अहवाल दिल्याने दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर झाला आहे. यातच कारखान्यावर स्फोटक पदार्थ बाबत व यंत्रसामुग्री बाबत हयगय व निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. निष्काळजीपणा करत कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. एफएलपी -1 प्लाँन्ट मध्ये लावलेला हायड्रोजन पँरोसाईड टँकला लावण्यात आलेला एमएम फ्लँजला गंज पडल्याने हायड्रोजन पँरोसाईड टाकीत रासायनिक प्रकिया होऊन उच्च दबाव निमार्ण झाला व वेंट लाईन बंद झाल्याने हायड्रोजन पँरोसाईड टाकिचा स्फोट झाला असल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. लाँकडाऊन मध्ये भिषण झालेल्या अपघातात संपूर्ण तारापुर हादरून गेले मात्र असे अपघात वारंवार घडत असताना देखील कायद्यातील पळवाटा शोधून कारखानदार स्वतः चे रक्षण करतात. यामुळे आता सात वर्षाखालील शिक्षा असल्याचे कारण पुढे करत कामगारांचा बळी घेणारा व्यवस्थापक मिलिंद पाटील मोकाट दिला तर त्यात काही नवल वाटण्यासारखे नाही. यातच हा आरोपी बुधवारी खुलेआम पणे कारखान्यात वावरत असल्याचे देखील उघड झाले आहे.
◾ अपघात घडतात पण कारखाने सुरक्षा विभाग करते काय
तारापुर औद्योगिक क्षेत्रात दर दोन वर्षात कारखाने सुरक्षा विभाग प्रत्येक कारखान्या मधील उपकरणे तपासणी करत असते असे कारखाना सुरक्षा विभागाकडून वारंवार सांगण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे कारखान्यांची तपासणी प्रत्येक सहा महिन्यात करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार औद्योगिक क्षेत्रात स्फोट घडत असताना देखील कारखाना सुरक्षा विभागाची कोणत्याही प्रकारची साधी चौकशी देखील करण्यात येत नाही. गँलेक्सी कारखान्याची उपकरणे नादुरुस्त होती असे जर कारखाना सुरक्षा विभाग बोलत असलेल तर त्यांनी याअगोदर कारखान्यांणी तपासणी खरच केली होती का असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.
◾ कारखान्यातील रियाक्टर रिसिव्ल चा झालेल्या स्फोटात हायड्रोजन पँरोसाईड हे रसायन होते. यातच अमाइड, हायड्रोजन पँरोसाईड, लँपाओ क्लीनसिंग याचा वापर करत उत्पादनात केला असल्याची माहिती समोर आली होती. कारखान्यातील रियाक्टर मध्ये साबन व हँडवाँश साठी लागणारा लँपो नामक पदार्थ कच्च्या माल जो हँडवाँश, स्फोअर वाँश व डेटॉल साठी उपयोग केला जातो हा बनविण्यात आला होता. यासाठी रियाक्टर मधील कच्चा मालाच्या प्रक्रियेत 900 लिटर हायड्रोजन पँरोसाईड मिक्स करण्यात आले होते. यातच रियाक्टर रिसिव्ल मध्ये अंदाजे 100 लिटर हायड्रोजन पँरोसाईड हे रसायन बाकी होते असे प्रथमदर्शनी तपासा मध्ये समोर आले होते.