पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात अडकून बसलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्या तहसीलदारांनाच आता सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. पालघर येथील आर्यन मैदानावर उडालेल्या गोंधळात तहसीलदार यांना चिथावणाऱ्या एका व्यक्तीला तहसीलदार यांनी लाथ मारली होती. याप्रकरणी कोकण महसूल आयुक्तांनी काही काळासाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
पालघर तालुक्यातून आपल्या मूळ गावी युपी,बिहार,राजस्थान आदी राज्यात जाण्यासाठी हजारो मजूर कामगारांनी आपली नोंद जिल्हा व तालुका प्रशासनाकडे केली होती. त्याच्या मागणीच्या अनुषंगाने 20 मे(बुधवारी) रोजी 6 हजार 667 कामगारांनी उत्तरप्रदेश ला जाण्यासाठी नोंद केल्याने रेल्वे प्रशासनाकडून ट्रेन्स ची मागणी करण्यात आली होती. सकाळी महसूल व पोलीस प्रशासनाने सकाळी 8 वाजल्यापासून आर्यन शाळेचे मैदान गाठीत उपस्थित मजुरांचे नियोजनाचे काम हाती घेतले.परंतु नोंद केलेल्या व्यतिरिक्त अन्य जादा हजारो मजूर ह्या मैदानावर उपस्थित राहिल्याने त्यांच्या कडून टोकण ची मागणी करण्यात येत होती. परंतु नोंद करण्यात आलेल्या 6 हजार 667 मजुरा व्यतिरिक्त अन्य मजुरांना टोकण देणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने उपस्थित मजुरां कडून सतत टोकण ची मागणी करण्यात येत होती. पोलीस प्रशासनाकडून सतत सांगून ही मोठी गर्दी करून काही मजूर तहसीलदार व उपस्थित महसूल प्रशासनाच्या लोकांकडे सतत मागणी करीत होते. ह्यावेळी काही मजुरांनी एकच गोंधळ घातल्याने पोलिसांनी समजून सांगून ही सोशल डिस्टनसिंग राखले जात नसल्याने काहींना लाठीचा प्रसाद दिला होता.
दरम्यान एका इसमाला टोकण दिले असताना अन्य एका टोकणची तहसीलदार सुनील शिंदे ह्यांच्या कडे सतत मागणी करणाऱ्याला त्यांनी टोकण संपल्याचे सांगूनही तो अंगावर येत असल्याने सकाळ पासून भर उन्हात उभ्या असलेल्या तहसीलदाराने त्याला एक फटका मारला.मात्र तो पुन्हा त्यांच्या अंगावर येऊ लागल्याने वैतागलेल्या तहसीलदाराने त्याच्या अंगावर लाथ उगारल्याचे समोर आले होते. यातच इसमावर सहज गुन्हा दाखल करणे शक्य असतानाही तहसीलदारांनी त्या मजुराला सुखरूपपणे ट्रेन पर्यंत पोचवले. अश्या परिस्थितीही 6 हजार667 मजुरांना चार ट्रेन्स मधून सोडण्यात आल्या नंतर मैदानावर उरलेल्या 2 हजार 020 मजुरांना माघारी न पाठवता तहसीलदार शिंदे ह्यांनी जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधत अन्य एक जादा ट्रेन मागवून रात्री 1 वाजता ही ट्रेन उत्तरप्रदेश च्या जोनपूर कडे रवाना करण्यात आली. या घटने चे व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड ह्यांनी तहसीलदार शिंदे यांना तातडीने रजेवर पाठवीले. यातच बोईसर भागातुन पायी चालत मध्यप्रदेश कडे निघालेल्या मजूरांना देखील तहसीलदार शिंदे यांनी बसने सीमेपर्यंत पाठवीले होते. मात्र एक अनावधानाने घडलेल्या प्रकारामुळे हजारो मजूरांना आपल्या घरी पाठविण्यासाठी झटणाऱ्या तहसीलदार यांना कारवाईला समोरे जावे लागले आहे.