13 वर्षांपासून तालुक्यातील पाणीपुरवठा योजना अपुर्ण अवस्थेत; मंत्रालयात तक्रारी करून ही कारवाई नाही
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: विक्रमगड तालुक्यात मार्च महिन्यापासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खंडात सुरु होण्यास सुरवात होते. मे महिन्यापर्यंत तर काही गाव-पाड्यात पाण्याची बिकट आवस्था होते. तालुक्यातील काही गावात खूपच कमी पाण्याचा साठ शिलक असून नदी- नाळे आटले असून विहारिणी तळ गाठण्यास सुरवात झाली असताना दरवर्षी पाणी टंचाईग्रस्त असणाऱ्या गाव- पाड्यांना कायम स्वरूपी उपाययोजना करण्याचे तर दूरच पण गेल्या 13 वर्षापासूनच्या तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत.
विक्रमगड तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना आज पर्यंत अर्धवट आवस्थेत आहेत यातील 6 योजना 14 वर्षापासून तर 4 योजना 7 वर्षापासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनाच्या अपूर्ण अवस्थेबाबत जिल्हा परीषद प्रशासनाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करून ही जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग प्रत्यक्ष कुठल्याच प्रकारची चौकशी करत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. या योजनांसाठी तब्बल 1 कोटी 97 लाख 59 हजार रुपये खर्च झाला आहे. तालुक्यातील 2004-05 साला पासून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत देहर्जे गावातील योजनेसाठी 15.85 लाख निधी मंजूर होता त्यापैकी 12.61 लाख वितरीत करण्यात आला.साखरे गावासाठी 22.99 निधी मंजूर होता त्यापैकी 17.73 वितरीत करण्यात आला आहे, केव( शीलशेत) गावासाठी 21.61 निधी मंजूर होता त्यापैकी 8.61 निधी वितरीत करण्यात आला आहे.त्यांनतर या योजनांचे कामच बंद करण्यात आल्याने या योजनात अपहार झाल्याने या योजना 13 वर्षा पासून रखडल्या आहेत.
2005-06 साली दादडे ( कमळ पाडा) गावासाठी 23.04 निधी मंजूर होता त्या पैकी 8.62 निधी वितरीत करण्यात आला आहे.जांभा- पोचाडा गावा साठी 10.51 निधी मंजूर होता त्या पैकी 6.61 निधी वितरीत करण्यात आला आहे .हातने गावासाठी 15.88 निधी मंजूर होता त्या पैकी 6.79 निधी वितरीत करण्यात आला आहे.तर 2011-12 साली खांड-उघानीपाडा गावसाठी 46.64 निधी मंजूर होता त्या पैकी 39.88 निधी वितरीत करण्यात आला आहे. टेटवाली ( बागपाडा) गावासाठी 34.24 निधी मंजूर होता त्यापैकी 29.27 निधी वितरीत करण्यात आला उपराले गावासाठी 45.44 निधी मंजूर होता त्या पैकी 38.85 निधी वितरीत करण्यात आला उटावली- पोटखल साठी 44.99 निधी मंजूर होता त्या पैकी 25.64 निधी वितरीत करण्यात आला आशा साखरे, केव, खांड -उघानीपाडा, दादाडे जांभा, हाताने, टेटवली, उपराले, उटावली, देहर्जे या गावांसाठी स्वातंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या, यासाठी निधी हि वितरीत करण्यात आला मात्र या योजनांमधील 6 योजनांचे काम 2004-05 मध्ये,तर 4 योजना 2011-12 मध्ये हाती घेण्यात आल्या. यासाठी निधी वितरीत करण्यात आला. यासाठी झालेल्या कामाचा हिशोब तब्बल 2 कोटीच्या आसपास निधी हि खर्च झाला. अशी माहिती पंचायत समिती कडून देण्यात आली आहे. मात्र आजही या काही पाणी पुरवठा योजनेतील काही गावात नळाला पाणी आजपर्यंत आलेले नाही. यातील देहर्जे, साखरे, केव या तीन योजनातील अपहार झाल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर बाकीच्या योजना या ना त्या कारणाने अद्याप रखडलेल्या आहेत.
योजनांचा निधी ग्रामपंचायातीना देण्यात येत असून पाणी पुरवठा विभाग फक्त देखा रेखीचे काम करते असा युक्तिवाद पाणी पुरवठा विभाग कडून करण्यात येतो. मात्र ग्रामीण भागातील बहुतांशी ग्रामपंचायती सक्षम नसल्याने ठेकेदार नेमून काम करण्यात येते. तरीही या योजना आजतागायत पूर्ण झाल्या नाहीत. या – ना त्या कारणाने या योजना अपूर्ण असल्याने या गावातील नागरीकांना पाण्यासाठी विहीर,नदी- नाल्यांचा आधार घ्यावा लागतो इतका निधी खर्च होऊनही या गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेऊन काय साध्य झाले. या योजना बंद अवस्थेत असून बराच कालावधी उलटला आहे.या योजनात गैरप्रकार झाल्याची नागरिकांकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे, आसे असताना पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 4 पाणी पुरवठा योजनाचे काम चालू असून 4 पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण होणार असल्याचे दावा पाणी पुरवठा अधिकार्यांनी केला आहे. त्यातच अंदाज पत्रकात वाढ करण्याचा प्रयत्न ठेकेदार व ग्रामपंचायती प्रयत्नात आहेत .मात्र या योजना मंजूर झाल्या तेव्हाच या योजना तडीस नेणे गरजेचे असताना. या योजनाच्या कामात चाल ढकल करून काय साध्य झाले असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. त्यात या योजना रखडवण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व ग्रामपंचायतीचे संबधीत पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
⭕मंत्रालयात तक्रारी करून ही चौकशी नाही
विक्रमगड तालुक्यातील या योजनांवर करोडोचा खर्च झाला आहे. तरी आजतागायत या योजना अपुर्ण असल्याने तालुक्यात कृत्रीम पाणी टंचाई दरवर्षी निर्माण होत आहे. या बाबत काही नागरिकांनी मंत्रालयात मागील दोन वर्षापुर्वी तक्रार ही केली होती. त्याचप्रमाने पंचायत समिती मार्फ़त जिल्हा परीषदेकडे ही तक्रार केली असताना या योजनाची प्रत्यक्ष कुठलीच चौकशी झाली नाही. विक्रमगड मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी पालकमंत्री विष्णु सवरा यानी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्तित विक्रमगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या योजना रखडवनाऱ्यावर कारवाई करण्यात येनार असल्याचे घोषणा केली होती. मात्र त्या नंतर काहीच हालचाल झाली नाही आणि आजही या योजना बंद स्थितीत आहेत.
⭕नवीन पाणी पुरवठा योजना
मुख्यमंत्री ग्रामीण पुरवठा योजने अंतर्गत विक्रमगड तालुक्यात खोस्ते ( गावित पाडा), आलोंडे, कासा बु या गावात योजना मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे या गाव-पाडातील पाणी प्रश्न सुटनार असुन योग्य ठेकेदारास या योजनेचे काम देवुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली लवकरात लवकर या योजना पूर्ण करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
◾तालुक्यातील रखड़लेल्या योजना पुर्ण करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. या योजना लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी आम्ही सर्वोत्त परीने प्रयत्न चालु आहेत. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक विहीरी नुतनिकरणची कामे सुरु आहेत
- एस.बी.कदम
( प्रभारी पाणी पुरवठा अभियंता,पंचायत समिति विक्रमगड)
◾ तालुक्यांती या पाणी पुरवठा योजना गेल्या 11-12 वर्षा पासून अपूर्ण अवस्थेत आहेत. या योजनेचा निधी ही. काढण्यात आले आहेत. तरीही या योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. या योजनाचा निधी काढनार्या संबंधित अधिकारी व ठेकेदार याची चौकक्षि करुण संबंधितावर गुन्हे दाखल करुण कड़क कारवाई करावी.या बाबत मंत्रालयात तक्रारी करून ही संमबिधितावर कुठलीच कारवाई होत नाही
- डॉ. सिद्धार्थ सांबरे
(सामाजिक कार्यकर्ते)