- उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभाग मेहरबान; तक्रारी करून देखील अधिकारी करतात दुर्लक्ष
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: तालुक्यातील नागझरी येथे शासनाने संपादित केलेल्या जागेवर बेकायदेशीर मातीचे उत्खनन सुरू आहे. मात्र तरीही महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांनी याकडे अनेक महिन्यांन पासुन दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. विषेश म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी याठिकाणी मातीचे उत्खनन केले जात असल्याचे दिसून आले आहे.
बोईसर पुर्वेकडील नागझरी भागात बेकायदेशीर पणे मुरूम माती, खदान खोदणे हे प्रकार काही नवीन नाही. नागझरी गावात ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात खोदकाम करून मातीचे उत्खनन केले जात आहे. याच ठिकाणी एक बेकायदेशीर दगड खदान देखील खोदकाम केले जात आहे. मात्र महसूल विभागाचे अधिकारी याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे. यातच खोदकाम करत असलेली जागा मुंबई बदोदरा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. तरी देखील महसूल विभाग येथील खदान माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसुन येत नाही. कितीही तक्रार केल्या तरी महसूल विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत असून त्यांचे कारण म्हणजे येथील माफियांन कडुन त्यांना मिळणारा महसूल यामुळे आजवर एकाही बेकायदेशीर खदानीवर चार वर्षांत ठोस कारवाई झालेली नाही.
नागझरी मध्ये रविवारी सुट्टीच्या दिवशी जेसीबी व पोकलेन मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जाते. विषेश म्हणजे मागील रविवारी बोईसर मंडळ अधिकारी यांना फोन वर तक्रार केल्यानंतर काही तासातच खोदकाम बंद करण्यात आले होते. याचा अर्थ खदान माफियांना स्थानिक अधिकाऱ्यांची साथ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच आठवड उलटून जात असताना देखील संबंधित महसूल विभागाचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. यामुळे नेहमी प्रमाणे खदान माफियांना पाठीशी घालणारे अधिकारी आता तरी कारवाई करतील का असा सवाल नागरीकांन कडुन उपस्थित केला जात आहे.
खदानीत बेकायदेशीर जिलेटीन स्फोट
नागझरी गावात ज्याठिकाणी खदान उत्खनन बेकायदेशीर पणे सुरू आहे. त्याठिकाणी खोदकाम करण्यासाठी बेकायदेशीर पणे जिलेटीन चा स्फोट केला जातो. खदानीची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना देखील दिवसभर स्फोट याठिकाणी केले जातात. जिलेटीन स्फोटामुळे याठिकाणी असलेल्या घरांना देखील तडा गेल्या आहेत.
◾ मागील वर्षी नागझरी येथील प्रविण अधिकारी या इसमावर बेकायदेशीर जिलेटीन साठा ठेवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यानुसार त्यांचा जिलेटीन वापराचा परवाना रद्द होणे गरजेचे असताना देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यातच हाच व्यक्ती याठिकाणी बेकायदेशीर खदान व मातीचे उत्खनन करत असल्याची माहिती समोर आली आहे