- महसुल विभागाच्या आर्शिवादाने अवधनगर येथे भंगारमाफियांने धोकादायक बस्तान
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: महसूल विभागाच्या आर्शिवादाने सरावली अवधनगर येथे असलेल्या सरकारी जागेवरील भंगार गोदामाला आग लागली आहे. शनिवारी दुपारच्या वेळी लागलेल्या आगीत पुर्ण येथील गोदाम जळून खाक झाले. बेकायदेशीर साठवणूक केलेल्या केमिकल व इतर ज्वलनशील वस्तु मुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथे महसूल विभागाच्या आर्शिवादाने भंगाराची मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवर गोडाऊन उभारण्यात आली आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा देखील ठेवण्यात येतो. याच ठिकाणी शनिवारी सकाळी 1 :30 वाजताच्या सुमारास भंगार गोदामाला भिषण आग लागली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब व दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी असलेले केमिकल यामुळे आगीचे लोण वाढत चालले होते. शर्तीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर चार ते पाच तासात नियंत्रण आणले आहे. यातच आगीचे लोण बाजुला असलेल्या वसतीवर देखील आग जात होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी यावर नियंत्रण आणल्याने कुठल्याही प्रकारची जिवंत आणी झालेली नाही.