◾ साठवणूक करून ठेवलेल्या रासायनिक घनकचऱ्यांची केली जात आहे विल्हेवाट; लाँकडाऊन चा फायदा घेवुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करू नये यासाठी कारखानदाराचा दबाव
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: लाँकडाऊन मध्ये औद्योगिक कारखाने सुरू करण्याची मुभा मिळाल्याने तारापुर मध्यील काही कारखान्यांनी प्रदूषण करणे सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी कारखान्यातील रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असुन कारखाने सुरू होताच प्रदुषणाचा स्थर वाढलेला दिसून येत आहे. यातच काही प्रदुषणकारी कारखान्यांना बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिले असल्याने कशा कारखान्यांवर कारवाई होऊ नये यासाठी काही बड्या उद्योजकांन कडुन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी प्रदुषणाची सुरूवात पुन्हा केली आहे. संचारबंदीत मोकळा श्वास घेणाऱ्या नागरीकांना आता पुन्हा प्रदुषणाची झळ सोसावी लागत आहे. येथील अनेक रासायनिक कारखाने रात्रीच्या वेळी कारखान्याच्या समोरील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी पुन्हा औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणाचा स्थर वाढला असुन लाँकडाऊन मुळे कमी असलेले कर्मचारी यामुळे याचा फायदा कारखानदार घेताना दिसून येतात. यातच मुंबई वेस्ट मँनेजमेंट च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचे पोलिसांनी अडवलेल्या अनेक वाहनावरून दिसून आले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषकारी कारखान्यांची तपासणी मध्ये दोषी आढळलेल्या 20 कारखान्यांवर कारवाई महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने केली आहे. मात्र लाँकडाऊन मध्ये अशा कारखान्यांंवर कारवाई करू नये अशी मागणी कामगरांच्या संघटना कडुन केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एकिकडे तारापुर मधील प्रदुषणाचा स्थर उंचावत असताना प्रदुषणकारी कारखान्यांवर कारवाई होऊ नये यासाठी होत असलेले दबाव यामुळे तारापुर अधिकच प्रदुषणाच्या खाईत आजवर गेले आहे. दिवसेंदिवस वाढणारे प्रदुषण तरी देखील अशा कारखान्यांवर पर्यावरण विभाग विषेश म्हणावी तशी कारवाई करत नसल्याचा आरोप नागरीकांन कडुन वारंवार केला जात आहे. मात्र तरीही राज्य सरकारने याकडे गंभीरपणे पाहत नसल्याने वर्षानुवर्षे तारापुर प्रदुषणकारी बनत चालले आहे.
◾ प्रदुषणकारी कारखानदारावर कारवाई केल्यानंतर प्रत्येक वेळी कामगारांचा रोजगार जाईल अशी ओरड निर्माण केली जाते. त्यानंतर कारखानदार त्यातील सुवर्ण मध्य काढुन आपले प्रदुषणकारी कारखाने पुन्हा सुरू करतात. रोजगाराचा विषय पुढे करून शासनाकडून प्रदुषणावर झापड टाकण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आलेला आहे.
◾ प्रदुषणकारी कारखान्यांवर कारवाई होऊनये गरजेचे असुन तपासणी मध्ये दोषी आढळलेल्या कारखान्यांवर कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत आदेश दिले होते. तसेच कारखान्यांना ज्या कारणांमुळे बंदचे आदेश दिले आहेत त्यामध्ये सुधारणा केल्यानंतरच कोणतेही कारखाने सुरू करण्याबाबत परवानगी दिली जाईल. प्रदुषण करणाऱ्यांवर यापुढे देखील कारवाई केली जाईल.
— राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ ठाणे