◾बोईसर गणेश भागातील धक्कादायक घटना उघड; महिलेचा खुन करून मृतदेह ड्रम मध्ये बंद करून घरचे फेब्रुवारी 2019 पासून गेले गावी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: एखाद्या सिनेमात असलेल्या घडामोडी सारखा बोईसर मध्ये खुनाचा उलघडा लागला आहे. येथील गणेश नगर भागात असलेल्या एका बंद घरात ड्रममध्ये महिलेचा सांगाड सापडला आहे. घरमालकाला घराचे भाडे टाळेबंदीत मिळाले नसल्याने त्यांचे घराचे लाँक तोडल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोईसर येथील गणेश नगर भागात एका घरात भाड्याने बिहार येथील कुटुंब राहत होते. हे कुटुंब फेब्रुवारी 2019 पासुन आपल्या गावी गेले होते. मात्र गावी गेलेले असताना देखील बोईसर मधील बंद असलेल्या घराचे घरभाडे नियमित मालकाला दिले जात होते. परंतु मार्चमध्ये करोनामुळे लागु झालेल्या टाळेबंदीत घराचे भाडे घरमालकाला मिळाले नाही. यामुळे रविवारी 19 जुलै 2020 रोजी सायंकाळी घर मालकांने बंद असलेेल्या घराचे टाळे तोडून आता प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात आलेेल्या दुर्गंधी मुळे घराची तपासणी केली असता शौचालयाच्या वरती ठेवलेल्या प्लास्टिक ड्रम मध्ये महिलेचा सांगाडा सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घर मालकांने याबाबत बोईसर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी करत बिहार मध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक पाठवले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या 17 महिन्यांन पासून जागी गेलेले कुटुंब आपल्याला घरभाडे का देते याबाबत जराही संशय या मालकाला का आला नाही हा मोठा प्रश्न समोर येत आहे. बोईसर भागात मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावर घरे दिली जात असून भाड्याने दिलेली बंद घरांमध्ये नेमका काय मुरतेय याचा वेळीच मागोवा घरमालकांने घेतला असता तर वेळीच खुनाचा उलघडा झाला असता. या घटनेचा अधिक तपास बोईसर पोलिस करत असुन बिहार मध्ये आरोपींच्या शोधत गेलेल्या पोलिसांच्या तपासा नंतर सर्व चित्र उघड होणार आहे.
◾मयत महिलेने सन 2017 मध्ये त्यांच्या घरच्यांच्या विरोधात सासु सासरे विरोधात तक्रार दाखल केली होती अशी माहिती समोर येत आहे. याबाबत निकाल लागल्यानंतर ही महिला त्याच घरात पुन्हा एकत्र राहत होती. यातच घर मालकांने बोईसर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत चार आरोपींनी आपसात संगनमत करून मयत महिलेने त्यांच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घ्यावी याकरिता तिला कशाने तरी जिवेठार मारून तिचे प्रेत प्लॉस्टिकचे निळे ड्रममध्ये कोबुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने ड्रम शौचायलाच्या पोटमाळ्यावर लपवून ठेवला अशी फिर्याद दिल्याने बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.