पालघर जिल्ह्यातील निर्भीड वृत्तपत्र म्हणून अल्पावधीत नावलौकिक मिळालेल्या नंतर वाचकांना अधिकाअधिक वेळेत ताज्या घडामोडींचा आडावा मिळावा यासाठी पालघर दर्पणने मोबाईल अँड्रॉइड अँप वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालघर दर्पण वृत्तपत्राचे मोबाईल अँड्रॉइड अँपचे अनावरण अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आजकालच्या धावपळीच्या व आँनलाईन युगात वाचकांना लवकरात लवकर ताज्या घडामोडींचा आडावा घेण्यासाठी पालघर दर्पणने या अँपचे अनावरण केले आहे. पालघर दर्पण अँप मध्ये ई पेपर आँनलाईन बातम्या व युटुब चँयनल च्या बातम्या अशा अनेक प्रकारच्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. हे अँप गुगल पेस्टोर वर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँपच्या अनावरण प्रसंगी पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील, पत्रकार जगदीश करोतीया, रियाज मुल्ला, विजय घरत, गजानन मोहिते, संदीप जाधव, सुरेंद्र निषाद आदी मान्यवर उपस्थित होते.