◾ महिलेला मारहाण करणाऱ्या भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांचा पराक्रमाचे विडीओ सोशलमिडीयावर; जिल्हा परिषद सदस्यांवर एकाच महिले कडून दुसऱ्यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल
◾पिडीत महिला रात्री 2 नंतर उशीरापर्यंत थांबुन देखील बोईसर पोलिसांनीकडून तक्रार दाखल करण्यासाठी चालढकल; दुसऱ्या दिवशी वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर बोईसर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेला बोईसर मध्ये एका राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी ने महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच महिलेने या लोकप्रतिनिधी विरोधात वर्षभरापूर्वी विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून पुन्हा मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महिलेला मारहाण करतानाचे विडीओ सोशलमिडीयावर प्रसिद्ध झाले आहेत. मात्र पिडीत महिलेला तक्रार दाखल करण्यासाठी रात्रभर ताटकळत उभे राहावे लागल्याचा लाजीरवाणा प्रकार उडला आहे.
बोईसर दांडीपाडा भागात राहणारी पिडीत महिला आपल्या मैत्रीणी सोबत 14 आँगस्ट रोजी दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यावरून चालत जात होती. यावेळी बाजूला असलेल्या जागेवरून दोन महिलांचे भांडण सुरू होते यातील एक महिला पिडीत महिलेची ओळखीची असल्याने पिडीत महिला व तिची मैत्री तिथे थांबली यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य चेतन धोडी यांने पिडीत महिलेला शिवीगाळ करत तु इथे का आली आहे अशी विचारणा करत मारहाण करण्यासाठी सुरुवात केली व त्याठिकाणी आलेल्या दिलीप धोडी यांनी देखील मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातच चेतन धोडी यांच्या विरोधात मागील वर्षी देखील याच महिलेचा विनयभंग गेल्याचा बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानापुन्हा याच पिडीत महिलेवर झालेल्या अन्यायावर न्याय मिळवून देण्याच प्रयत्न न करताच बोईसर पोलिसांनी संधी शोधण्याचा प्रयत्न केला होता.
महिलेला मारहाण झाल्यानंतर सदर महिला बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली 14 आँगस्ट रोजी दुपारी झालेल्या प्रकाराची तक्रार दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 आँगस्ट रोजी रात्री 8 वाजता दाखल करण्यात आली आहे. ही पिडीत महिला 14 आँगस्ट रोजी रात्री अतिशय उशिरा 2 वाजेपर्यंत पेक्षा अधिक वेळ पोलीस पोलीस ठाण्यात आपल्यावर तक्रार दाखल करण्यासाठी उभी असताना देखील तक्रार घेतली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. याऊलट बोईसर पोलिसांनी पिडित महिलेवरच आरोपीच्या बहिनीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिडीत महिलेवरच गुन्हा दाखल करून महिलेला घरी पाठवुन देण्यात आले दुसऱ्या दिवशी 15 आँगस्ट रोजी या महिलेने न्यायासाठी सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडे जाऊन आपल्यावरील अन्याया बाबत माहिती दिली त्यानंतर बोईसर उपविभागीय अधिकारी यांच्या सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा महिलेला मारहाण व विनयभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जमावबंदी असताना महिलेला भर रस्त्यात मारहाण करण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्यांवर जमावबंदी चे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आलेली नाही.