◾ नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल्स कारखान्यात स्फोट; चार कामगार जखमी तर एक कामगार बेपत्ता
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात झालेल्या भिषण स्फोटात तारापूर पुर्ण हादरले असून स्फोटात एका कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी असून एक कामगार बेपत्ता आहे . त्यांचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. स्फोटाचा आवाज दुरवर गेल्याने काही काळ नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड प्लाँट नं. टी-141 या कारखान्यात सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला.या स्फोटामुळे बोईसर, सालवड, पास्थळ, तारापूर, अशा अनेक गावे हादरून केली होती. स्फोटाचा भिषण आवाज पंधरा किलोमीटरवर असलेल्या पालघर ला देखील जाणवला होता. ड्रॉईंग इंटरमिजिएट तसेच सोलवेंट डिस्टिलेशन करणाऱ्या या कारखान्यात हायड्रॉलिसिस प्रतिक्रिया चालू होती त्यावेळी रियाक्टर मध्ये भिषण स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दला कडून मिळाली आहे. स्फोटानंतर परिसरात वायु पसरल्याने तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाला शोध कार्य करण्यास अडथळे निर्माण झाले होते.
कारखान्यात झालेल्या भिषण स्फोटात काही पाईपाचे तुकडे व वाँल दुरवर उडल्याचे दिसून येत होते. स्फोट झाला त्यावेळी 14 कामगार कामावर हजर होते. भिषण स्फोटात पहिल्या मजल्यावरून खाली पडलेल्या संदीप कुशवाह हा कामगार जागीच ठार झाला आहे. यातच चार कामगार जखमी झाले असून मोहम्मद मोसिन अल्ताभ (30), दिलीप गुप्ता (28), उमेश कुशवाहा (22) व प्रमोद कुमार मिश्रा या कामगारांंन वर बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यात उपस्थित असलेल्या कामगारांन पैकी बृजेश कुमार मौर्या हा कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.