पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस नजीकच्या वैतरणा नदीवरील पुलाच्या कठड्याला भरधाव इनोव्हा कार धडकल्याने अपघात झाला.या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला.ओवेस लुलानीया (वय.22) असे मयत कार चालकाचे नाव असून तो पालघरचा रहिवासी होता.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी 21 आँगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरील भरधाव इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कार पुलाच्या कठड्याला धडकली.या अपघातात कारचा चक्काचूर झाल्याने कार चालक अपघात ग्रस्त कार मध्ये अडकून पडला होता.दोन क्रेनच्या साहाय्याने मयत कार चालकाचा मृतदेह बाहेर काढावा लागला.मयत कार चालक पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक जावेद लुलानीया यांचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे.