◾ विधीवत पुजाअर्चा करून साजरा करणार गणेशोत्सव; बोईसर मध्ये शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळ सज्ज
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: करोनामुळे सणासुदीवर संकट ओडवल्याने यावर्षी अनेक सण साजरे करताना निर्बंध घालण्यात आले आहेत. काही दिवसांवर गणेशोत्सव असल्याने यावर्षी करोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले असून शासनाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. महिनाभर पुर्वी तयारी साठी लागणारी बोईसर मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दोन दिवसापासून कमीत कमी जागेत मंडप उभारून गणरायाच्या स्वागताच्या तयारीला लागलेले पाहावयास मिळतात.
महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कोकणा बरोबर कोकण किणारपट्टी असलेल्या पालघर जिल्ह्यात अतिशय जोशाने गणेशोत्सवाचे आगमन केले जाते. वर्षभर भावीक गणरायाचे आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदा देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटामुळे उत्सवावर निर्बंध शासनाने घातले आहेत. बोईसर मध्ये देखील शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली असून दोन दिवसापासून अनेक लहान मोठी मंडळे कोणत्याही प्रकारचा देखावा न करता साधेपणाने मंडप उभारणीचे काम हाती घेतले आहे. सार्वजनिक मंडळात केल्या जाणाऱ्या महाआरती, भजन, सांकृतिक कार्यक्रम अशा अनेक गोष्टी टाळून साधेपणाने आपल्या लाडक्या बाप्पाची पुजाअर्चा करणार असल्याचे अनेक मंडळांनी जाहीर केले आहे. कार्यक्रम जरी नसले तरी वेळेवर विधीवत पुजन केले जाणार असून यावेळी अनेक ठिकाणी रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी देखील शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे ठरवले असून या महामारी करोना आजाराचा फैलाव होऊन नये यासाठी पाच पेक्षा अधिक लोकांना मंडपामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे अनेक मंडळांनी लोकसत्ता सोबत बोलताना सांगितले. बोईसर मध्ये पंचतत्व सेवा संस्था अवधनगर, एमआयडीसी चा राजा कँम्नीन नाका, बोईसर रेल्वे स्थानक येथे रिक्षा चालक मालक संघटना, वंजार वाड्याचा राजा, बोईसरचा महाराजा अशा विविध सार्वजनिक मंडळात हजारो नागरीक दर्शनासाठी येत असतात. मात्र यावेळी मंडळांनी देखील शासनाच्या निर्देशानुसार उत्सव साजरा केल्याने गर्दीवर नियंत्रण येणार आहे.
◾ सार्वजनिक गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून बोईसर मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी देशावर ओडावलेल्या करोनाच्या संकटामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार त्यांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. रक्तदान शिबीर घेतले जाणार असून पाच पेक्षा अधिक लोकांना मंडपामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मात्र विधीवत केल्या जाणाऱ्या पुजा तशाच प्रकारे सुरक्षतेची काळजी घेवून केल्या जाणार आहेत.
— प्रभाकर राऊळ, अध्यक्ष पंचतत्व सेवा संस्था बोईसर