चिमुकल्यांचा बाप्पा
◾ रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: गणेशोत्सव म्हटलं की चिमुकल्यांंन पासून मोठ्यांन पर्यंत सर्वच जन उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करतात. यंदा करोनाच्या संकटा मुळे उत्सवावर निर्बंध आले असले तरी मोठ्या उत्साहात भक्तीभावाने गणरायाचे पुजन करण्यात आले. बोईसर मधील काटकर पाडा भागात असलेल्या महावीर कुंज बी-विंग येथील रहिवासी लोकांनी गणेशोत्सव साजरा करताना नवीन मुर्तीची स्थापना न करता आपल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या लहान संगमरवरी गणेश मूर्तीचे ११ दिवस पूजन करण्याचे ठरवले. येथील लहान मुलांनी व युवकांनी एकत्र येवून छोटेसे डेकोरेशन करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. रोज नियमित गणरायाची पुजा व आरती घेवून प्रसाद नैवेद्य दाखवून भक्तीभावाने गणरायाची पुजा केली जाते. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून यंदाप्रमाणेच दरवर्षी गणेश चतुर्थीला वेगळी मूर्ती न आणता याच मूर्तीची पूजा करण्यात येईल असे देखील महावीर कुंज बी-विंग येथील रहिवासींनी ठरवले असून साधेपणाने व भक्तीभावाने गणरायाचे पुजन कसे केले जाते याबाबत एक वेगळा संदेश या माध्यामातून समाजाला मिळाला आहे.